पतीचे ब्युटी पार्लर महिलेशी प्रेमसंबंधाचा संशय, बायकोनं तिच्यावर अॅसिडने हल्ला करण्यास दिली सुपारी, नंतर...
Crime news : एका महिलेला आपल्या पतीचे अनैतिक प्रेमसंबंध सुरु असल्याची भनक लागली होती. तिने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर अॅसिडने हल्ला करण्यासाठी एका व्यक्तीला सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह 3 जणांना अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेनं घेतली बदल्याची आग
पतीचं बाहेर होतं प्रेमसंबंध
तिनं एकाला सुपारी देऊन महिलेवर अॅसिड फेकण्यास सांगितलं
Crime news : बिहारच्या पाटणातील मोकामा येथे एका महिलेला आपल्या पतीचे अनैतिक प्रेमसंबंध सुरु असल्याची भनक लागली होती. याच बदल्याची आग म्हणून तिने ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर अॅसिडने हल्ला करण्यासाठी एका व्यक्तीला सुपारी दिली. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह 3 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेचं नाव नीतू देवी असे आहे. ती मोकामा येथील डाकबंगला येथील रहिवासी आहे. तिचा पती कुंदन मिश्राचे ब्युटी पार्लरच्या मालकाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. तिने तिच्या मोलकरीन सुमन देवीसोबत मिळून अॅसिड हल्ल्याचा कट रचला होता. हा अॅसिड हल्ला मोहम्मद एहसानला करण्यास सांगितला होता, अशी माहिती समोर आली होती.
हे ही वाचा : 'कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा...', राज-उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
गुन्ह्यात तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या प्रकरणात पोलिसांनी सुमन आणि एहसान यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच अॅसिड हल्ल्यात मदत करणाऱ्या मोहम्मद एहसानच्या साथीदाराची शोधमोहिम सुरु ठेवण्यात आली. मोहम्मद हा एहसान हा बारह येथील रहिवासी असल्याचं तपासातून समोर आलं होतं. तसेच आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
अॅसिड हल्ल्यासाठी एक लाख रुपये आणि...
दरम्यान, बारहचे एसडीपीओ आनंद कुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितलं की, 'आरोपी नीतू देवी हिला तिचा पती आणि पीडितेमध्ये काहीतरी प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय बळावला होता. तिने तिच्या मोलकरणीसोबत मिळून पीडितेवर अॅसिडने हल्ला करण्याचा कट रचला. नीतू आणि सुमन यांनी ब्युटी पार्लर महिलेवर अॅसिड फेकण्यासाठी मोहम्मद एहसानला एक लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. रविवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी मालकावर अॅसिड हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला होता.
हे ही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अॅसिड हल्ला केलेल्या व्यक्तीच्या घरी पोलिसांची धाड
या घटनेनंतर, आरोपी नीतू देवी आणि सुमन ब्युटी पार्लरच्या मालकाला एका उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. सोमवारी रात्री पोलिसांनी एहसानच्या घरी धाड टाकली होती. त्यात अॅसिडची बाटली आणि त्या अॅसिडमध्ये भिजवलेले कापड देखील जप्त करण्यात आले. नीतू देवी यांच्या घरातून पोलिसांनी 97 हजार रोख रक्कम जप्त केली, ही रक्कम तिने एहसानसाठी ठेवली होती, असं सांगण्यात येत आहे.










