तीन मुलं झाली पण तरीही परपुरुषासोबत तार जुळले, 6 महिन्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली, अन् खतरनाक प्लान आखला
Crime News : सोशल मीडियाच्या भ्रामक जगात झालेल्या ओळखीतून आपल्या जीवाभावाच्या नात्यांचा शेवट करण्यापर्यंत काहींची मजल जाते. अशीच ही हादरवून टाकणारी घटना आहे. एका तीन मुलांच्या आईने आपल्या फेसबुक प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी किरणने तिचा प्रियकर शिवकुमार लोधी आणि त्याचा मित्र धर्मेंद्र लोधी यांच्यासोबत मिळून 31 जानेवारीच्या रात्री जगभान यांची गोळ्या झाडून हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन मुलं झाली पण तरीही परपुरुषासोबत तार जुळले
हिन्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली, अन् खतरनाक प्लान आखला
Crime News : सोशल मीडियाच्या भ्रामक जगात झालेल्या ओळखीतून आपल्या जीवाभावाच्या नात्यांचा शेवट करण्यापर्यंत काहींची मजल जाते. अशीच ही हादरवून टाकणारी घटना आहे. एका तीन मुलांच्या आईने आपल्या फेसबुक प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी किरणने तिचा प्रियकर शिवकुमार लोधी आणि त्याचा मित्र धर्मेंद्र लोधी यांच्यासोबत मिळून 31 जानेवारीच्या रात्री जगभान यांची गोळ्या झाडून हत्या केली. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी जगभान यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला होता. उत्तर प्रदेशातील झाशी येथील ही घटना आहे.
हे ही वाचा : कांद्याच्या पिकात अफूची लागवड, उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय
फेसबुकवरुन झाली ओळख
मूळचे तालबेहट येथील रहिवासी असलेले जगभान कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा 20 हजार रुपये घरी पाठवत असत. मात्र, याच काळात साधारण सहा महिन्यांपूर्वी किरणची ओळख फेसबुकच्या माध्यमातून शिवकुमार लोधीशी झाली. या ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात झाले. जगभान कामावर असताना किरण अनेकदा आपल्या प्रियकराला भेटायला जात असे. पतीला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने विरोध केला. यामुळे घरात सदद वाद होऊ लागले. या वादातून सुटका मिळवण्यासाठी आणि प्रियकरासोबत राहण्यासाठी किरणने पतीच्या हत्येचा कट रचला.
बायकोनेच विकत घेतली बंदूक
या हत्येच्या कटात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पतीला मारण्यासाठी वापरलेले शस्त्र किरणने स्वतःच्या पैशातून विकत घेतले होते. तिने प्रियकर शिवकुमारला बंदूक खरेदी करण्यासाठी 9 हजार रुपये दिले होते. 31 जानेवारीच्या रात्री किरणने एका बहाण्याने पतीला बोलावून घेतले, जिथे दबा धरून बसलेल्या शिवकुमारने जगभान यांच्या डोक्यात गोळी झाडली. हत्या केल्यानंतर आरोपी शिवकुमार मध्य प्रदेशात पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या.










