भाच्याने मामाला भररस्त्यातच धारदार शस्त्राने संपवलं, कौटुंबिक वादातून हत्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीत
Crime News : भाच्याने आपल्याच मामावर भररस्त्याच धारदार शस्त्राने वार करत संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना सकाळी 11 वाजता घडली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपी तरुण मोहम्मद एजाजला अटक केली, तसेच रक्ताने माखलेली कुऱ्हाड घटनास्थळावरून जप्त केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाच्याकडून मामाचा भररस्त्यात खून
कौटुंबिक वादातून हत्या
Crime News : भाच्याने आपल्याच मामावर धारदार शस्राने हल्ला करत संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना सकाळी 11 वाजता घडली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपी तरुण मोहम्मद एजाजला अटक केली, तसेच रक्ताने माखलेली कुऱ्हाड घटनास्थळावरून जप्त केली. मृत मामाचे नाव मोहम्मद रईश (वय 65) असे आहे. नंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी थारमध्ये अत्याचार, व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची दिली धमकी
भाच्याकडून मामाचा भररस्त्यात खून
संबंधित घटनेची माहिती मिळताच डीएसपी डॉय गौरवर कुमार आणि चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकिशोर कुमार हे घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा त्यांनी तपास सुरु केला. मृताची मुलगी शबनम खातूनने सांगितलं की, तिचे वडील गुरुवारी सकाळी घराबाहेर पडले, पण परतले नाही. तिचा भाऊ मोहम्मद एजाज घराबाहेर गेला, त्यानेच वडिलांना मारलं. घटनेचा थरार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्या सीसीटीव्हीत एजाज धारदार शस्त्राने हल्ला करत असल्याचं दिसतं.
कौटुंबिक वादातून हत्या
डॉ. गौरवने सांगितलं की, कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून एजाजला अटक केली. त्याच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान एजाजने उघड केले की, त्याच्या मामाने कुटुंब त्याच्या पत्नीला त्रास देत होते, यामुळे तो रागावला आणि त्याने हा गुन्हा केला.
हे ही वाचा : जावयाला होतं ड्रग्सचं व्यसन, 'त्या' एका कारणावरून सासूवर गोळीबार करत संपवलं
संबंधित हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यातच क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचे दिसून येते. व्हिडिओत एजाज हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर दिसला होता. नंतर त्याने अचानकपणे हल्ला केला, या हल्ल्यानंतर काहीच सेकंदात रईश तिथेच खाली कोसळतो. व्हिडिओत अनेक लोक घटनास्थळावरून जाताना दिसत आहेत.










