जावयाला होतं ड्रग्सचं व्यसन, 'त्या' एका कारणावरून सासूवर गोळीबार करत संपवलं

मुंबई तक

crime news : घरगुती वादातून जावयाने आपल्या सासूवर गोळीबार करत संपवलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित प्रकरणाचा तपास केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जायवाने सासूवर केला गोळीबार 

point

आरोपी ड्रग्जचा व्यसनी

Crime News : घरगुती वादातून जावयाने आपल्या सासूवर गोळीबार केला. या गोळीबारात सासूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित प्रकरणाचा तपास केला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनेची माहिती मिळवली. ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडली आहे.  

हे ही वाचा : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी थारमध्ये अत्याचार, व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची दिली धमकी

जायवाने सासूवर केला गोळीबार 

आरोपी जावयाचे नाव गुलनवाज (वय 30) असे आहे, तर खूनात मृत्यू झालेल्या सासूचे नाव रुखसाना (वय 45) असे होते. गुलनवाज गुरुवारी सायंकाळी 7 वाजता त्याच्या सासरी आला होता. त्याचे सासू रुखसानासोबत वाद झाले होते, हा वाद इतका वाढला की आरोपीने सासूवर गोळी झाडली आणि ती गंभीर अवस्थेत घटनास्थळी पडली. 

आरोपी ड्रग्जचा व्यसनी

घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली. महिलेला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने मृत महिलेच्या मुलीशी चार वर्षापूर्वी विवाह केला होता. तेव्हापासून त्याचे त्याच्या सासरच्या लोकांशी वाद झाले होते. मृताच्या मुलीने सांगितलं की, आरोपी ड्रग्जचा व्यसनी होता. घटनेच्या दिवशी तो त्याचा मित्र मुस्तफारसोबत घरी आला. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील केला असता, तो संतापला आणि त्याने सासूवर गोळीबार केला. 

हे ही वाचा : गोव्याच्या किनाऱ्यावर फुल्ल दारु प्यायले, समोर रशियन महिला दिसताच नराधमांमधील राक्षस जागा, नको ते करण्याचा प्रयत्न..

पोलिसांनी पैशाच्या वादातूनच ही हत्या झाल्याचं सांगितलं. मृत सासूच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली, तसेच मुस्तफाला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp