इन्स्टाग्रामवरचं प्रेम, महाराष्ट्रातली तरुणी भोपाळला गेली, पण शेवटी सेफ्टिक टँकमध्ये आढळला सडलेला मृतदेह
Crime News : एका पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद पेटीमध्ये एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन-तीन दिवसांपासून येत असलेल्या उग्र दर्पामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाण्याची टाकी तपासली असता, त्यात एक पेटी तरंगताना आढळली. या पेटीत पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्या महिलेच्या नवऱ्यानेच तिची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला आरोपीची तिसरी बायको होती
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इन्स्टाग्रामवरचं प्रेम, महाराष्ट्रातली तरुणी भोपाळला गेली
पण शेवटी सेफ्टिक टँकमध्ये आढळला सडलेला मृतदेह
Crime News : एका पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद पेटीमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन-तीन दिवसांपासून येत असलेल्या उग्र दर्पामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाण्याची टाकी तपासली असता, त्यात एक पेटी तरंगताना आढळली. या पेटीत पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्या महिलेच्या नवऱ्यानेच तिची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला आरोपीची तिसरी बायको होती. सिया असं मृत महिलेचं नाव असून मध्य प्रदेशातील भोपाळ मधील ही घटना आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर: मुंबईच्या कोस्टल रोडवर भारतातील पहिला 'म्यूझिकल रोड'! वाहनचालकांना अनोखा फील...
गोंदियातून गेली भोपाळला
आरोपी समीर हा व्यवसायाने रिक्षाचालक असून, त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या सियासोबत काही महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले होते. सिया ही मूळची महाराष्ट्रातील गोंदियाची राहणारी होती. समीरच्या भुलथापांना बळी पडून ती त्याच्यासोबत भोपाळला गेली. सुरुवातीला त्याने सिया ही आपली मेहुणी असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते, मात्र नंतर ते पती-पत्नी म्हणून राहू लागले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, समीर आणि सिया यांच्यात वारंवार वाद होत असत. या वादातूनच समीरने 9 फेब्रुवारी रोजी तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका पेटीत भरुन पाण्याच्या टाकीत टाकला. विशेष म्हणजे, या पेटीतून त्याच्या दुसऱ्या बायकोने हुंडा दिला होता. त्याची दुसरी बायको त्याला सोडून माहेरी जबलपूरला गेली होती.
दुर्गंधीमुळे पितळ उघडे पडले
हत्या केल्यानंतर समीर आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला होता. तो दुसऱ्या पत्नीला घेऊन परतत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाच्या शरीरावर जखमांच्या खुणा असून तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाला असावा. हत्येनंतर समीरने अत्यंत चलाखीने पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या टाकीतून येणाऱ्या दुर्गंधीने त्याचे पितळ उघडे पाडले.










