नर्तकीने स्टेजवर नृत्य करताना नाणं गिळलं, नंतर प्रकृतीत झाला बिघाड, कार्यक्रमात उडाला गोंधळ
Viral News : नर्तकी नृत्य सादर करताना स्टेजवर एक धक्कादायक प्रकार घडला. आनंदाचं वातावरण लगेचच बदलून गेलं. प्रेक्षकांनी नर्तकीला नाणं दिलं आणि तोंडत ठेवण्यास सांगितलं, त्याचे विपरीत परिणाम तिला भोगावे लागले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडून गेली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नर्तकी नृत्य सादर करताना स्टेजवर धक्कादायक प्रकार
तोंडात घातली नाणी
Viral News : नर्तकी नृत्य सादर करताना स्टेजवर एक धक्कादायक प्रकार घडला. आनंदाचं वातावरण लगेचच बदलून गेलं. प्रेक्षकांनी नर्तकीला नाणं दिलं आणि तोंडत ठेवण्यास सांगितलं, त्याचे विपरीत परिणाम तिला भोगावे लागले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडून गेली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. यामुळे भरकार्यक्रमात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र समोर आलं.
हे ही वाचा : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी थारमध्ये अत्याचार, व्हिडिओ रेकॉर्ड करत व्हायरल करण्याची दिली धमकी
कार्यक्रमात नृत्य सादर करताना नर्तकीने तोंडात घातली नाणी
वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील एक महिला नर्तकी कार्यक्रमात सादरीकरण करत होती. याच कार्यक्रमादरम्यान, काही प्रेक्षकांनी उत्साहात तिच्या तोंडात नाणी घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान नर्तकीने एक नाणे गिळले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. काही वेळानंतर तिला नाचताना अस्वस्थ वाटू लागले आणि कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.
नर्तकीची प्रकृती बिघडली
नर्तकीची प्रकृती बिघडल्याचे पाहून डान्स पार्टी आयोजकांनी आणि महिला नर्तकीच्या पतीने विलंब न करता तिला आर सदर रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखदेखीखाली उपचार सुरु आहेत. दरम्यान, नाणे घशात अडकले की पोटात याचा डॉक्टर शोध घेत आहेत.
हे ही वाचा : भाच्याने मामाला भररस्त्यातच धारदार शस्त्राने संपवलं, कौटुंबिक वादातून हत्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीत
स्टेज शोदरम्यान प्रेक्षकांमुळे कलाकारांना कोणते धोके निर्माण होतात यावर स्थानिक लोक चर्चा करत आहेत. या घटनेनं कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.










