11 वीच्या विद्यार्थीनीवर 4 वेगवेगळ्या कारमध्ये नेऊन अत्याचार, व्हिडीओ बनवून 40 हजार कमावले; नराधमांना अटक

मुंबई तक

11 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने खंडणी वसूल केल्याचं अतिशय संतापजनक वृत्त समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

एक नव्हे तर 4 कारमध्ये घृणास्पद कृत्य...
एक नव्हे तर 4 कारमध्ये घृणास्पद कृत्य...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

11 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

point

एक नव्हे तर 4 कारमध्ये घृणास्पद कृत्य...

point

आरोपीच्या विकृत कृत्यांचा खुलासा

Crime News: 11 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने खंडणी वसूल केल्याचं अतिशय संतापजनक वृत्त समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित पीडितेसोबत एक नव्हे तर चार कारमध्ये आरोपींनी घृणास्पद कृत्य केल्याची माहिती आहे. आता, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एका थारसह 4 कार जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. संंबंधित प्रकरण हे भोपाळमध्ये असल्याचं वृत्त आहे. 

पीडितावर बलात्कार करणारा आरोपी औसाफ आधीच आरोपी औसाफ आधीच तुरुंगात असून त्याचा साथीदार मेजर खान यालाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. दरम्यान, पीडितेसोबत चार वेगवेगळ्या कारमध्ये घृणास्पद कृत्य केल्याचं तपासातून समोर आलं. 

बलात्कार अन् व्हिडीओ रेकॉर्ड... 

प्रकरणातील मुख्य आरोपी औसाफ अली खानला 3 फेब्रुवारी रोजी अटक करून त्याची तुरुंगात रवागनी करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या सहकाऱ्याला 8 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतलं असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. चौकशीदरम्यान, औसाफचा साथीदार आरोपी माज खान याने धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने सांगितलं की, खानूगाव परिसरात थारमध्ये पीडितेवर औसाफ अलीने बलात्कार केला आणि त्यावेळी तो कारच्या बाहेर उभा राहून काचेतून आयफोनमध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवून त्यांनी पीडितेकडून 40 हजार रुपये लुबाडले. 

हे ही वाचा: पत्नीने नंबर ब्लॉक केला, पतीने थेट लोणावळ्यातील टायगर पॉईंटरवरुन उडी मारली; बायकोच्या वाढदिवशी संपवलं आयुष्य

इतकेच नव्हे तर, अल्पवयीन पीडितेला अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी घटनेत वापरलेली थार कार सीहोर जिल्ह्यातील एका गावात लपवून ठेवली होती. तसेच, ज्या आयफोनमधून व्हिडीओ शूट करण्यात आला, तो अद्याप सापडला नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp