पत्नीने नंबर ब्लॉक केला, पतीने थेट लोणावळ्यातील टायगर पॉईंटरवरुन उडी मारली; बायकोच्या वाढदिवशी संपवलं आयुष्य
पुण्याच्या लोणावळ्यातून पती आणि पत्नीच्या वादाचं अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या नैराश्यातून पतीने 250 फूट खोलीत दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीचा वाढदिवस ठरला शेवटचा दिवस!
लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून उडी मारून पतीची आत्महत्या...
Pune Suicide Case: पुण्याच्या लोणावळ्यातून पती आणि पत्नीच्या वादाचं अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीने आपला मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या नैराश्यातून पतीने 250 फूट खोलीत दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. वीरेंद्र सिन्हा अशी मृत व्यक्तीची ओळख समोर आली आहे. पीडित तरुण हा मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो पुण्यातील हिंजवडी येथे नोकरी करत होता. कंटेनर विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या सेल्स विभागात तो कार्यरत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून वीरेंद्र आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. वृत्तानुसार, 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्यात मोठा वाद झाला आणि त्यानंतर 10 फेब्रुवारी पत्नी रागाच्या भरात आपल्या माहेरी निघून गेली. खरं तर, काल म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. पीडित वीरेंद्र मध्यरात्रीपासून त्याच्या पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नंबर ब्लॉक असल्याकारणाने त्याचा आपल्या पत्नीशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर, सायंकाळी जवळपास 5 ते 6 वाजताच्या दरम्यान पतीने टेक्स्ट मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून पत्नीला आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा: दुधातून झोपेच्या गोळ्या द्यायचे अन् मुलांचे नग्न फोटो पाठवून सौदा... मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'असा' झाला पर्दाफाश
250 फूट खोल दरीत उडी मारून पतीची आत्महत्या
पत्नीने मॅसेज पाहिल्यानंतर तिने त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. पीडित वीरेंद्र सिन्हाने टायगर पॉइंटवरून जवळपास 200 ते 250 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. स्थानिक बचाव दलाने दरीतून मृतदेह बाहेर काढला असून लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्रचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लोणावळा शिवदुर्ग आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकांनी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
हे ही वाचा: कांद्याच्या पिकात अफूची लागवड, उपतालुका प्रमुखाचा प्रताप समोर येताच ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय
गेल्या आठवड्यात याच परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता, अशा घटनांची वाढती संख्या पाहता, टायगर पॉइंट आणि आसपासच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची आणि स्थानिक रहिवाशांनी सतर्क राहण्याची गरज आहे.










