नंदुरबार: आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून 8 वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल...
नंदुरबारमध्ये एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून 8 वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार!
नंदुरबारमधील धक्कादायक घटना
Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी मुख्यापकाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने आपल्या आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या भायनक प्रकाराबद्दल सांगितलं असता या प्रकरणी धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
वसतीगृहाच्या व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापकाचं नाव रायसिंग वसावे असून त्याच्याविरुद्ध एका 8 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, वसतीगृहाची व्यवस्थापिका मालती पाडवी हिच्याविरुद्ध सुद्धा या प्रकरणासंबंधी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: रत्नागिरी: मध्यरात्री मुलगा लघुशंकेसाठी उठला, पण बाजूला आई नसल्याने बिथरला अन् शोध घेताच घराबाहेरील बाथरूममध्ये...
विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबद्दल आणि भविष्याबाबत प्रश्नचिन्ह
आरोपीने आपल्या वाईट कृत्याची वाच्यता होऊ नये, म्हणून त्याने पीडितेला या घटनेबाबत कोणलाही सांगितल्याच जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. मुख्याध्यापकाच्या या घृणास्पद कृत्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने, आश्रम शाळांतील विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच, या घटनेमुळे पालकांच्या मनात सुद्धा मुलींना शाळेत पाठवण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा: बीड : प्रेमसंबंध तुटले अन् तरुणीला विरह सहन होईना, थेट मुलीच्या घरात घुसली अन्...
आदिवासी संघटनांमध्ये संतप्त वातावरण
ही घटना समोर आल्यानंतर, विशेषत: आदिवासी संघटनांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गावकरी आणि आदिवासी संघटनांकडून आता या घटनेतील आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.










