बीड : प्रेमसंबंध तुटले अन् तरुणीला विरह सहन होईना, थेट मुलाच्या घरात घुसली अन्...
Beed Crime News : केज तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण सध्या लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. याच गावातील एका तरुणीसोबत त्याचे काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर हे संबंध संपुष्टात आणण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : प्रेमसंबंध तुटले अन् तरुणीला विरह सहन होईना
थेट मुलाच्या घरात घुसली अन्...
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध तुटल्यानंतर घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काही काळ प्रेमसंबंधात असलेल्या तरुण-तरुणीचे नाते तुटल्यानंतर संबंधित तरुणीने थेट तरुणाच्या घरात घुसून गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण सध्या लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. याच गावातील एका तरुणीसोबत त्याचे काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर हे संबंध संपुष्टात आणण्यात आले. दोघांमध्ये पुन्हा कोणताही संपर्क राहणार नाही, यासाठी नातेवाईकांच्या उपस्थितीत लेखी शपथपत्रही करण्यात आले होते. असे असतानाही हा वाद शांत न होता अधिकच चिघळत गेला. 14 डिसेंबर रोजी तरुणाच्या लहान भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना संबंधित तरुणी अचानक तरुणाच्या घरी पोहोचली. यावेळी घरात नातेवाईक आणि पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. उपस्थितांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
यानंतरही प्रकरण इथेच थांबले नाही. 22 डिसेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास संबंधित तरुणी पुन्हा एकदा तरुणाच्या घरी आली. यावेळी तिने घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप आहे. तिने घराच्या दरवाजावर थुंकल्याचा तसेच घरच्यांशी वाद घालून शिवीगाळ केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तरुणाच्या वडिलांनी तिला जाब विचारला असता, आपण इथून जाणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.










