मुंबईची खबर: देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड... आता वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा!

मुंबई तक

आता मुंबईप्रमाणे ठाण्यात सुद्धा कोस्टल रोडची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे, आता घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार असल्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड...
देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड...

point

आता वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा!

Mumbai News: आता मुंबईप्रमाणे ठाण्यात सुद्धा कोस्टल रोडची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे, आता घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार असल्याची शक्यता आहे. बाळकुंभ ते गायमुख दरम्यान बांधण्यात येणाऱ्या 13.45 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी कोस्टल रोडचं बांधकाम वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या महत्त्वाकांक्षी रोड प्रकल्पाचे काम आठ महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केलं असून 3,364 कोटी रुपये खर्चून हा रोड बांधण्यात येत आहे. 

आठ महिन्यांतच प्राधिकरणाने कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे 50 टक्के काम पूर्ण केलं असून फाउंडेशन वर्कनंतर, खांबांवर पिलर कॅप्स आणि आय गर्डर्स बसवण्याचं काम सुरू झालं आहे. 

देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड 

MMRDA च्या माहितीनुसार, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीन फील्ड कोस्टल रोड प्रोजेक्ट असून या योजनेत पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइल आणि सिंगल पिलर टेक्निकचा वापर केला जात आहे. पर्यावरण संवर्धन आणि मँग्रूव्ह क्षेत्रांचं संरक्षण करण्यास प्राधान्य देऊन रस्त्याचा मोठा भाग उड्डाणपूल म्हणून विकसित केला जाईल. 

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत मोठ्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी! पदवीधरांनी लवकरच करा अर्ज...

हा मार्ग एक समर्पित मालवाहतूक मार्ग म्हणून देखील विकसित केला जात आहे. कोस्टल रोड खुला झाल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. गर्दीच्या वेळी नेहमीच घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब रांगा असतात. भिवंडी आणि कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक बाळकुंभजवळ वाहतूक कोंडीत अडकतात. कोस्टल रोडचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल. तसेच, बाळकुंभ येथून कोस्टल रोडवर थेट प्रवेश शक्य होईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp