Govt Job: सरकारी बँकेत मोठ्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी! पदवीधरांनी लवकरच करा अर्ज...

मुंबई तक

पदवीधरांसाठी बँकिंग सेक्टरमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. SBI CBO भरतीअंतर्गत एकूण 2050 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ADVERTISEMENT

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत मोठ्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी!

point

पदवीधरांनी लवकरच करा अर्ज...

Govt Job: सध्या, बरेच तरुण उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळतं. अशा उमेदवारांसाठी बँकिंग सेक्टरमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. SBI CBO भरतीअंतर्गत एकूण 2050 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. आता ही तारीख वाढवली असून उमेदवारांना 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन (पदवी) ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, इंजीनिअर, डॉक्टर, सीए अशा कॉस्ट अकाउंटंटसारख्या प्रोफेशनल डिग्रीचं शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST) आणि अपंग उमेदवारांना कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे उमेदवारांना अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या अधिकारी संवर्गात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

हे ही वाचा: कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं अन् विवाहितेवर लैंगिक अत्याचार! नंतर आरोपीची भलतीच मागणी...

कशी होणार निवड? 

या भरतीअंतर्गत, चार टप्प्यांच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांसाठी 170 गुणांची ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल. या परीक्षेत 120 गुणांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 50 गुणांच्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ चाचणीत बँकिंग नॉलेज, सामान्य जागरूकता, इंग्रजी आणि कंप्यूटर अॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित प्रश्न असतील. त्यानंतर, उमेदवारांचे डॉक्यूमेंट्स आणि अनुभव सर्टिफिकेट तपासले जातील. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, ही मुलाखत 50 गुणांची असेल. जर उमेदवाराने 10 वी किंवा 12 वी इयत्तेत स्थानिक भाषा शिकली नसेल, तर त्यांना भाषा चाचणी देखील उत्तीर्ण करावी लागेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp