केरळची सर्वात लहान organ donor; 10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!
Kerala's youngest organ donor : पथानामथिट्टा जिल्ह्यातील मल्लप्पल्ली येथील Alin Sherin Abraham ही 10 महिन्यांची चिमुकली 5 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाली. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसह कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एम.सी. रोडने प्रवास करत होती. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अॅलिनला गंभीर दुखापत झाली, तर तिची आई आणि आजी-आजोबा देखील जखमी झाले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केरळची सर्वात लहान organ donor
10 महिन्यांची चिमुकली 5 जणांचा जीव वाचवणार!
Kerala's youngest organ donor : केरळमध्ये हृदय पिळवटून टाकणाऱ्या दु:खद घटनेतून आशेचा किरण उजळलेला पाहायला मिळालाय. केरळमधील सर्वात लहान organ donor म्हणजेच 10 महिन्यांच्या Alin Sherin Abraham या चिमुकलीमुळे 5 जणांना जीवनदान मिळण्याची शक्यता आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे अनेक कुटुंबीयांना त्याच्या जवळचा व्यक्ती वाचवता येणार आहे.
10 महिन्यांच्या Alin चा अपघाती मृत्यू अन् कुटुंबीयांचा अवयव दान करण्याचा निर्णय
पथानामथिट्टा जिल्ह्यातील मल्लप्पल्ली येथील Alin Sherin Abraham ही 10 महिन्यांची चिमुकली 5 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाली. ती आपल्या आई आणि आजी-आजोबांसह कोट्टायमहून तिरुवल्लाकडे एम.सी. रोडने प्रवास करत होती. यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात अॅलिनला गंभीर दुखापत झाली, तर तिची आई आणि आजी-आजोबा देखील जखमी झाले होते.
प्रथम तिला चंगनाश्शेरी आणि तिरुवल्ला येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी तिला कोची येथील Amrita Hospital येथे हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही 13 फेब्रुवारी रोजी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या अत्यंत कठीण प्रसंगी तिचे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन अॅन जॉन यांनी तिचे अवयव दान करण्यास संमती दिली.










