T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला, 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
T20 World Cup 2026 : प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वने 169 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 170 धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, झिम्बाब्वेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंना केवळ 146 धावाच करता आल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर,
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला
19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
ICC Men's T20 World Cup 2026 स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळालाय. कमकुवत मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव करत खळबळ उडवून दिलीये. कोलंबो येथील R. Premadasa Stadium मैदानावर झालेल्या ग्रुप-बी मधील 19व्या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला नमवले. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वने 169 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 170 धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, झिम्बाब्वेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंना केवळ 146 धावाच करता आल्या.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत 20 षटकांत 2 बाद 169 धावा उभारल्या. ब्रायन बेनेटने 56 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत डाव सांभाळला. याशिवाय तदिवानाशे मारुमानी आणि रायन बर्ल यांनी 35 धावांची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले.. कर्णधार सिकंदर रझा 13 चेंडूत 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोइनिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
हेही वाचा : तीन मुलं झाली पण तरीही परपुरुषासोबत तार जुळले, 6 महिन्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली, अन् खतरनाक प्लान आखला
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. जोश इंग्लिस, कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड आणि ट्रॅव्हिस हेड हे प्रमुख फलंदाज अवघ्या 29 धावांत बाद झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी 59 चेंडूत 77 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मात्र रायन बर्लने मॅक्सवेलला 31 धावांवर बाद करत ही जोडी फोडली आणि सामन्याचे पारडे पुन्हा झिम्बाब्वेकडे झुकले. रेनशॉने 44 चेंडूत 65 धावा केल्या; पण इतर फलंदाज अपयशी ठरले. मार्कस स्टोइनिस आणि बेन ड्वारशुइस प्रत्येकी 6 धावांवर बाद झाले. अॅडम झॅम्पा 2 धावांवर माघारी परतला, तर शेवटी मॅथ्यू कुहनेमन धावबाद झाला. झिम्बाब्वेकडून वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीने 4 षटकांत 17 धावा देत 4 बळी घेत निर्णायक कामगिरी बजावली. ब्रॅड इव्हान्सने 3.3 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद केले.










