आधी लिंग बदलाची शस्त्रक्रिया अन् आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय, पुन्हा सर्जरी करणार, VIDEO शेअर करत म्हणाली...

मुंबई तक

नुकतंच, अनाया बांगरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयबाबत सांगितलं आहे. आता ती पुन्हा नवीन सर्जरी करणार असल्याचं व्हिडीओमध्ये म्हणाली.

ADVERTISEMENT

आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय
आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आधी लिंग बदलाची शस्त्रक्रिया अन् आता अनाया बांगरचा आणखी मोठा निर्णय

point

अनाया पुन्हा सर्जरी करणार

point

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सगळंच सांगितलं

Anaya Bangar about new surgery: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कोच संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने  शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला आणि त्यानंतर त्याची अनाया बांगर अशी तिची नवी ओळख निर्माण झाली. अनाया नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिने शेअर केलेले बरेचसे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतंच, अनायाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या जेंडर अफर्मिंग सर्जरीबाबत सांगितलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना अनाया नेमकं काय म्हणाली? सविस्तर जाणून घ्या. 

अनायाने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं. यामध्ये ती 14 मार्च रोजी बँकॉकमध्ये जेंडर रिसाइनमेंट सर्जरी करण्यासाठी जाणार असल्याचं म्हणाली. 

हे ही वाचा: T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला, 19 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

अनाया पोस्टमध्ये काय म्हणाली? 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

"गेल्या अनेक वर्षांपासून, मी मानसशास्त्रीय मूल्यांकन, थेरपी, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, वैद्यकीय मूल्यांकन आणि दोन पूर्वीच्या लिंग-पुष्टीकरण प्रक्रियांच्या टप्प्यांतून गेले आहे. आतापर्यंत मी प्रत्येक पाऊल कायदेशीर, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि पूर्ण विचार करून उचललं आहे."

"ट्रान्झिशनिंग म्हणजेच संक्रमण हे आवेगपूर्ण (Impulsive) नाही. ते संरचित, डॉक्यूमेंटेड आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp