Maharashtra Weather : राज्यात 'या' विभागात सकाळी धुके, तर काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढणार
maharashtra weather : राज्यात हवामान कोरडं राहील असा IMD विभागाने अंदाज वर्तवल आहे. पण पालघर आणि किनारपट्टीच्या भागात वातावरण उष्ण असेल असा अंदाज आहे. मुंबईसह किनारपट्टीवर आकाश निरभ्र राहील, तसेच दुपारनंतर उष्णता जाणवेल असा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हवामान कोरडं राहील असा IMD विभागाचा अंदाज
किनारपट्टीच्या भागात वातावरण उष्ण
Maharashtra Weather : राज्यात हवामान कोरडं राहील असा IMD विभागाने अंदाज वर्तवल आहे. पण पालघर आणि किनारपट्टीच्या भागात वातावरण उष्ण असेल असा अंदाज आहे. मुंबईसह किनारपट्टीवर आकाश निरभ्र राहील, तसेच दुपारनंतर उष्णता जाणवेल असा अंदाज आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : माधुरी दीक्षितच्या सर्वात वादग्रस्त गाण्यावर गौतमी पाटीलचा तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडलं! पाहा व्हिडीओ
कोकण : कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये वातावण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. थंडावा कमी जाणवेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे, पण सकाळी हलकी धुके दिसून येतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र : 'या' विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये सकाळी काही प्रमाणात धुके तर दुपारी ऊन जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाडा : मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.










