Govt Job: इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी! 10 पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...
उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन आर्मीकडून अग्निवीर भरती 2026 साठी नोटिफिकेशन जाहीर झालं असून उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंडियन आर्मीमध्ये देशसेवेची सुवर्णसंधी!
10 पास उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...
Indian Army Agniveer Recruitment 2026: भारतीय सैन्यात सहभागी होण्याचं लाखो उमेदवारांचं स्वप्न असतं. या इच्छुक उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन आर्मीकडून अग्निवीर भरती 2026 साठी नोटिफिकेशन जाहीर झालं असून उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
आनंदाची बाब म्हणजे, ज्या उमेदवारांना त्यांचं वय जास्त असल्याची चिंता आहे, ते सुद्धा अर्ज करू शकतील. आता 22 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 13 फेब्रुवारी म्हणजे आज या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 1 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
1. अग्निवीर (जनरल ड्यूटी): या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण/ मॅट्रिक पास असणं आवश्यक आहे. तसेच, पाच बेसिक विषयांत किमान 33 टक्के गुण असणं गरजेचं आहे.
2. अग्निवीर टेक्निकल: विज्ञान/ भौतिकशास्त्र/ गणित आणि इंग्रजी या विषयांसह 10+2 इंटरमीडिएट परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.










