यवतमाळ: शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केल्याचा आरोप... भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!
यवतमाळच्या उमरखेडमधील एका शाळेत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेच्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केल्याचा आरोप...
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!
Yavatmal Crime: यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यवतमाळच्या उमरखेडमधील एका शाळेत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटना ही 26 जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरेखेडमधील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान घडली.
या प्रकरणासंबंधी भारतीय जनता पक्षाचे नेते गोपाल कलाणे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. संबंधित तक्रारीच्या आधारे, उमरखेड पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम 196(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेचे मुख्याध्यापक संचार उल्ला खान अब्दुल खान आणि शिक्षक मोहम्मद फरोज आशा अशी अटक केलेल्या व्यक्तींची ओळख समोर आली आहे.
देशद्रोहाच्या श्रेणीत असल्याचा आरोप...
तक्रारीनुसार, शाळेच्या स्नेहसंमेलनात "ये मर्द ये मुजाहिद, तेरी अलगर क्या है" हे गाणं गायले गेलं आणि त्यावर नृत्य करण्यात आलं. हे गीत पाकिस्तानमध्ये लष्करी प्रेरणादायी गीत म्हणून ओळखले जात असून ते तिथे देशभक्तीच्या भावना जागृत करतं. गोपाल कलाणे यांच्या आरोपानुसार, शाळेच्या कार्यक्रमात अशा पाकिस्तानी गाण्याचं गायन आणि त्यावर नृत्य करणं हे अनेक नागरिकांच्या भावना दुखावणारं कृत्य असून ते देशद्रोहाच्या श्रेणीत येतं.
हे ही वाचा: मुंबई: मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट; IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्... घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते
भाजप नेत्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर निषेधाची लाट उसळली आहे आणि सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळत. आहे. उमरखेड पोलिसांनी संबंधित प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे.










