मुंबई: मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट; IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्... घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते

मुंबई तक

मुंबईत मॅट्रिमोनिअल साइटवर घटस्फोटित महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी स्वत:ची IPS अधिकाऱ्याचा मुलगा आणि घटस्फोटित महिलांची मदत करणाऱ्या एका एनजीओचा कार्यकर्ता अशी ओळख सांगून पीडितांची फसवणूक करायचा.

ADVERTISEMENT

घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते
घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मॅट्रिमोनियल साइटवर पाठवली रिक्वेस्ट

point

IPS अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा अन्...

point

घटस्फोटित महिलेसोबत केलं नको ते

Mumbai Crime: मुंबईत मॅट्रिमोनिअल साइटवर घटस्फोटित महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित 45 वर्षीय आरोपी स्वत:ची IPS अधिकाऱ्याचा मुलगा आणि घटस्फोटित महिलांची मदत करणाऱ्या एका एनजीओचा कार्यकर्ता अशी ओळख सांगून पीडितांची फसवणूक करायचा. पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीचं नाव विराज भोसले असून त्याने बऱ्याच महिलांना लग्नाचं खोटं आश्वासन देऊन, सरकारी योजनांतर्गत घरे आणि फिल्म इंडस्ट्रीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं वृत्त आहे. 

मॅट्रिमोनियल वेबसाइटवर पाठवली रिक्वेस्ट... 

आरोपी विराजवर मुलुंडमधील रहिवासी असलेल्या एका महिलेकडून 17.70 लाख रुपये लुबडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याची मर्सिडीज कार जप्त केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, त्याचं मुंबईत कायमचं घर नसून तो त्याच्या कारमध्येच राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार 42 वर्षीय ग्राफिक डिझायनर असून ती मुलुंडमध्ये राहते. तिचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर, सुमारे चार वर्षांपूर्वी तिने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर स्वत:ची प्रोफाइल तयार केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला लग्नासाठी प्रपोजल रिक्वेस्ट आली होती, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर, त्याच पुरुषाने ऑक्टोबर महिन्यात तिला आणखी एक रिक्वेस्ट पाठवली आणि त्या महिलेने ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. 

आरोपीचा खोटा दावा 

आरोपीने दुसऱ्या दिवशी तिच्याशी संपर्क साधला आणि पुण्यातील रहिवासी असलेला विराज भोसले अशी स्वतःची ओळख करून दिली. त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहेत आणि आई फिजिओथेरपिस्ट असून त्याची बहीण यूकेमध्ये राहत असल्याचा त्याने दावा केला. त्याने त्या महिलेला पुढे सांगितलं की तो स्त्री सूत्रम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्याचे महाराष्ट्रातील राजकारणी तसेच इतर मोठ्या पदांवरील लोकांशी जवळचे संबंध आहेत. 

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी भोसले याने सीएसआर निधी, निर्भया निधी आणि अनेक सरकारी योजना मॅनेज करत असल्याचा केला. या योजनांद्वारे त्याने घटस्फोटित आणि विधवा महिला तसेच सिंगल मदर्स म्हणजेच एकट्या मातांना आर्थिक मदत केल्याचं त्याने पीडितेला सांगितलं. या योजनांद्वारे महिलेला मुंबईत परवडणारं घर मिळवून देण्यास मदत करण्याचं त्याने आश्वासन देत त्याने तिच्याकडून सुरुवातीला 7 लाख रुपयांची मागणी केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp