मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, अन्…

मुंबई तक

crime news : एका किशोरवयीन मुलीवर शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका मौलवीला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका किशोरवयीन मुलीवर शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार

point

मौलवीच्या सहकाऱ्यांनी पीडितेला धमकावले

Crime News : एका किशोरवयीन मुलीवर शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही तांडा येथील रहिवासी असून ती मुलगी धार्मिक शिक्षणासाठी मौलवीकडे जात होती. मात्र, शिक्षणाच्या नावाखाली मौलवीने तिचे शारीरिक शोषण केल्याची मन हेलावणारी घटना घडली.

हे ही वाचा : मध्यरात्री हॉटेलमध्ये सुरु होता चार जोडप्यांचा घाणेरडा खेळ, पोलिसांनी रेड टाकताच नको त्याच अवस्थेत आढळले

मौलवीकडून मुलीवर लैंगिक अत्याचार 

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पीडिता आणि तिच्या कुटुंबाने मौलवीच्या कृतीचा निषेध व्यक्त केला तेव्हा काही लोकांनी त्यांना धमकी दिली होती. कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली होती. तक्रारीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी मौलवी यासीनसह आठ जणांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

अहवालानुसार, हे प्रकरण कोतवाली शहर पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणात परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं पीडितेसोबत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. रामपूर येथे राहणाऱ्या मौलवी यासीन हा मुलीला धार्मिक शिक्षण देत असल्याचा आरोप आहे. मुलगी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मौलवीकडे नेहमी जात होती.

मौलवीच्या सहकाऱ्यांनी पीडितेला धमकावले

संबंधित तक्रारीत आरोप करण्यात आला की, तिच्या 14 वर्षीय मुलीवर एका मौलवीने लैंगिक अत्याचार केला होता. जेव्हा पीडितेनं याबाबतची माहिती तिच्या कुटुंबाला सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मौलवीच्या सहकाऱ्यांनी तिला अनेकदा धमकावले देखील होते. पण तिला शांत राहण्याऐवजी कोणताही पर्याय नव्हता. नंतर तिने भयभीत न होता पोलिसांकडे धाव घेतली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp