पत्नीला नवऱ्यानं बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, बायकोनं ग्राईंडरने नवऱ्याचे केले तुकडे, नंतर मृतदेह पिशवीत भरून...
crime news : मेरठच्या मुस्कानसारखा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीनेच आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा ग्राईंडरने खून केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बॅगेत अर्धवट शिरच्छेद केलेला मृतदेह
मोबाईल फोनमधून भलतंच उलगडलं...
पतीने पत्नीला पुरुषासोबत रंगेहाथ पकडले
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुस्कानसारखा एक धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. पत्नीचे एका परपुरुषाशी प्रेमसंबंध सुरु होते. नंतर तिच्या पतीची क्रूरतेनं हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला त्याच्यावर हातोड्याने हल्ला केला आणि नंतर रॉडने बेदम मारहाण केली. नंतर ग्राईंडरने मृतदेहाचे तुकड़े केले. तसेच मान देखील छाटण्यात आली आणि हात-पाय शरीरापासून वेगळे करण्यात आले.
हे ही वाचा : पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप
बॅगेत अर्धवट शिरच्छेद केलेला मृतदेह
एका महिन्यापूर्वी चौंदाली कोतवाली येथील मोहल्ल्यातील एका नाल्याजवळ एका बॅगेत अर्धवट स्वरुपात शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला होता. त्याचे डोके आणि पाय छाटून वेगळे करण्यात आले होते. चांदौसी कोतवाली प्रभारी अनुज तोमर आणि सीओ चांदौसी मनोज कुमार सिंह हे घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर त्यांनी घटनेचा तपास केला, मृताच्या मृतदेहाची ओळख त्याच्या हातावर असलेल्या राहुल नावाच्या टॅटूवरून झाली होती. हा राहुल नेमका कोण आहे? हे ओळखणे पोलिसांना कठीण होऊन बसलं होतं.
या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुमारे 25 दिवसांपूर्वीत एका महिलेने चांदौसी पोलीस ठाण्यात तिचा पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला होता. सूत्रांचे म्हणणे आहे की, यूपी तक या वृत्त माध्यमाला हत्येबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
मोबाईल फोनमधून भलतंच उलगडलं...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर रोजी 25 दिवसांपूर्वी तिचा पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या रुबीला चौकशीसाठी बोलावले गेले होते. मृतदेहावरील कपडे बघून रुबीने तिचा पती राहुल नसल्याचं सांगितलं. तेव्हा पोलिसांनी तिला अनेक प्रश्न केले होते. तसेच त्यांनी रुबीचा मोबाईल फोन देखील शोधला होता. नंतर त्याच फोनवरून राहुलचे अनेक फोटो आढळून आले होते. याच फोटोवरून समजले की, मृतदेह हा तिच्या पतीचाच आहे. पोलिसांचा तपास पुढे चालू राहिला. ही घटना मेरठच्या मुस्कानसरखीच होती. या प्रकरणात पोलिसांनी राहुलची पत्नी रुबी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आणि नंतर चौकशी केली तेव्हा हत्येमागील सत्य समोर आलं.










