घरात घुसून विवाहितेचा विनयभंग, पतीने पाहिलं अन्... आरोपीच्या 'त्या' कृत्यामुळे पीडितेचं टोकाचं पाऊल!
घटनेच्या दिवशी पीडितेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर त्याने त्याच्या परिसरातील एका तरुणाला आपल्या पत्नीवर अत्याचार करताना पाहिलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घरात घुसून विवाहितेचा विनयभंग
पत्नीचा विनयभंग होताना पतीने पाहिलं अन्...
आरोपीच्या 'त्या' कृत्यामुळे पीडितेचं टोकाचं पाऊल!
Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने तिच्यावरील अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, घटनेच्या दिवशी पीडितेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर त्याने त्याच्या परिसरातील एका तरुणाला आपल्या पत्नीवर अत्याचार करताना पाहिलं. त्यावेळी, महिलेचा पती प्रचंड संतापला आणि त्याचा आरोपीसोबत मोठा वाद झाला. त्यानंतर, हे प्रकरण थेट पोलिसात पोहोचलं.
पैसे घेऊन प्रकरण मिटवल्याचा आरोप...
मिळालेल्या माहितीनुसार, फैजान खान नावाचा आरोपी तक्रारदाराच्या महिलेवर सतत शारीरिक अत्याचार करत होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी किरकोळ आरोपाखाली प्रकरण मिटवल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला. त्यानंतर, महिलेचा पती सुरेंद्र याने हे प्रकरण मिटवण्यासाठी 7 ते 8 लाख रुपये घेतल्याची अफवा पसरली. या खोट्या आरोपांमुळे आणि बदनामीच्या भीतीने महिला पूर्णपणे खचली आणि ती मानसिक तणावात गेली.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा 'नाबार्ड'मध्ये नोकरी! महिन्याला 3.85 लाख रुपये पगार अन्...
पत्नीने आत्महत्या केल्याचं समजलं अन्...
शुक्रवारी महिलेचा पती त्याच्या दुकानात असताना त्याला फोन आला आणि त्यावेळी त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. संबंधित महिलेचं 10 वर्षांपूर्वी लग्न झालं असून त्यांना दोन मुले (8 आणि 5 वर्षांची) होती. मात्र, आईच्या मृत्यूमुळे ते निराधार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी आता फैजानवर आरोप केले आहेत.
हे ही वाचा: एका माणसाची 268 मुलं? पनवेल महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ? उच्च न्यायालयात याचिका दाखल
मृत महिलेच्या पतीचे गंभीर आरोप
मृताच्या पतीने याबाबत माहिती देताना सांगितलं की, 10 डिसेंबरच्या रात्री फैजान खानने बळजबरीने त्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. यासंबंधी, गंभीर आरोप लावण्याऐवजी पोलिसांनी फक्त कलम 354 आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. फैजानने त्याच्या पत्नीचा शारीरिक छळ केला असून यापूर्वी त्याने तिच्यावर बलात्कारही केल्याचा आरोप सुद्धा तक्रादाराने केला. पुढे तो म्हणाला की, या घटनेनंतर महिलेच्या पतीने पैसे घेऊन हे प्रकरण दाबून ठेवल्याची अफवा पसरली आणि यामुळे पत्नी मानसिकदृष्ट्या खचली. यामुळे, पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचं त्याने सांगितलं. आरोपीने पसरवलेली अफवा आणि पोलिसांची कारवाई हेच पत्नीच्या मृत्यूमागचं मुख्य कारण असल्याचा तक्रारदाराने आरोप केला आहे.










