एका माणसाचे 268 मुलं? पनवेल महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ? उच्च न्यायालयात याचिका दाखल
Panvel Municipal Corporation voter list : अरविंद म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे की, संबंधित मतदार यादीतील 268 नावे ही बहुतांश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. हे सर्वजण प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नसतानाही, एकाच पत्त्यावर त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एका माणसाचे 268 मुलं?
पनवेल महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ?
शेकापकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल
Panvel Municipal Corporation voter list : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीतून समोर आलेल्या धक्कादायक गैरप्रकारामुळे खळबळ उडाली आहे. एका वडिलांच्या नावावर तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याने हा केवळ तांत्रिक दोष नसून, गंभीर घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे काय म्हणाले?
अरविंद म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे की, संबंधित मतदार यादीतील 268 नावे ही बहुतांश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. हे सर्वजण प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नसतानाही, एकाच पत्त्यावर त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर एका वडिलांच्या नावाखाली नोंदी आढळणे हे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येचा भाजपमध्ये प्रवेश, पुण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का
अरविंद म्हात्रे पुढे बोलताना म्हणाले की, हा प्रकार साधी प्रशासकीय चूक नसून, निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असू शकतो. बाहेरील राज्यांतील लोकांची नावे स्थानिक मतदार यादीत समाविष्ट करून निवडणुकीत गडबड घडवून आणण्याचा डाव यातून दिसून येतो, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. एका वडिलांच्या नावावर 268 मुले दाखवणे म्हणजे मतदार यादीची थट्टाच आहे. हा प्रकार लोकशाही मूल्यांचा थेट अपमान करणारा आहे. बनावट आणि संशयास्पद नोंदी करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे,” असेही अरविंद म्हात्रे यांनी नमूद केले.










