18 वर्षीय रशियन मुलीचा सौदा, महिलांच्या अंगावर मजकूर, पाहा एपस्टीन फाइल्समधील 3 खळबळजनक फोटो
US democrats release 68 epstein nws photos : याशिवाय एका अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या टेक्स्ट मेसेजचे स्क्रीनशॉटही समोर आले आहेत. या मेसेजमध्ये मुली पाठवण्याबाबत चर्चा असून, प्रति मुलगी 1,000 डॉलर दराचीही चर्चा आहे. यामध्ये रशियातील एका 18 वर्षीय मुलीचा उल्लेखही करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
18 वर्षीय रशियन मुलीचा सौदा
महिलांच्या अंगावर मजकूर
एपस्टीन फाइल्समधून खळबळजनक फोटो समोर!
US democrats release 68 epstein nws photos : अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील डेमोक्रॅट्सनी गुरुवारी लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या जेफ्री एपस्टीनच्या मालमत्तेतून 68 नवे फोटो जगासमोर आणले आहेत. या छायाचित्रांच्या प्रसिद्धीमागील उद्देश म्हणजे एपस्टीनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करणे. एपस्टीनचा तुरुंगात मृत्यू होण्यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या 95,000 फोटोंच्या संग्रहातून हे फोटो हाऊस ओव्हरसाइट कमिटीला 2019 मध्ये मिळाल्याचे सांगितले जात आहे.
डेमोक्रॅट्सनी जाहीर केलेल्या या फोटोंमध्ये एपस्टीन अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींसोबत विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित असल्याचे दिसत आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, चित्रपट दिग्दर्शक वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन, तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की तसेच माजी ट्रम्प सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे. यापैकी दोन छायाचित्रांमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सने दिले स्पष्टीकरण
यामधील एका फोटोत न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्सही दिसत आहेत. यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने एक निवेदन जारी करत स्पष्ट केले की, ब्रूक्स यांनी 2011 मध्ये एका जेवणाच्या (पार्टी) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम त्यांच्या कामासाठी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने होता. टाइम्सने पुढे असेही सांगितले की, त्या कार्यक्रमापूर्वी किंवा नंतर लेखकाचा (एपस्टीनसोबत) कोणताही संपर्क नव्हता.
या छायाचित्रांच्या प्रकाशनातून कोणत्याही व्यक्तीने गैरकृत्य केल्याचा थेट पुरावा मिळत नाही. समितीने स्पष्ट केले की, या छायाचित्रांपैकी एकाही छायाचित्रात एपस्टीनच्या ओळखीतील व्यक्तींनी केलेल्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे दर्शन होत नाही. मात्र, या छायाचित्रांमधून एपस्टीनचा प्रभाव आणि संपर्क जाळे स्पष्टपणे दिसून येते, हे डेमोक्रॅट्सनी स्पष्ट केले आहे.










