मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची 'MaMu’ कॉम्बिनेशनवर मदार?

ऋत्विक भालेकर

Mumbai Mahapalika election : बीएमसीत एकूण 227 वॉर्ड्स असून, त्यापैकी सुमारे 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे. त्याचबरोबर जवळपास 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika election
Mumbai Mahapalika election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत ठाकरे बंधूंची 'MaMu’ कॉम्बिनेशनवर मदार?

point

सुमारे 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव

Mumbai Mahapalika election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी भाजपला शह देण्यासाठी नवी रणनिती आखण्यास सुरुवात केलीये. मराठी आणि मुस्लिम मतदारांचे कॉम्बिनेश साधत ‘MaMu’ म्हणजेच Marathi–Muslim या समीकरणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः बीएमसीतील वॉर्डरचना आणि मतदारांची संख्या लक्षात घेता, ही रणनीती निर्णायक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीएमसीत एकूण 227 वॉर्ड्स असून, त्यापैकी सुमारे 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे. त्याचबरोबर जवळपास 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे. या वास्तवाचा अभ्यास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून जागावाटपाचे सूत्र ठरवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये ‘MaMu’ फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : सरकारी वकील बदला, संतोष देशमुख हत्या प्रकरणातून उज्ज्वल निकमांना हटवण्याची मागणी

मात्र, या चर्चांदरम्यान काही अडथळेही समोर आले आहेत. मनसेने उद्धव ठाकरे यांच्या चार विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांतील वॉर्ड्सवर दावा केल्याने जागावाटपात पेच निर्माण झाला आहे. वरळी, दादर-माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा क्षेत्रांमध्ये मनसेने अधिक जागांची आग्रही मागणी केली आहे. हे भाग पारंपरिकरित्या मराठीबहुल असून शिवसेनेसाठीही ते बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे या वॉर्ड्सवर एकमत साधणे दोन्ही पक्षांसाठी आव्हान ठरत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp