'राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शरद पवार कुटुंब प्रमुख, तेच आमचे...', अमोल मिटकरी यांचं वक्तव्य

मुंबई तक

Amol Mitkari : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला काही दिवस झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी एक अजितदादांच्या निधनावर संशय व्यक्त केला. मी अपघात न म्हणता याला घातपातच म्हणतो, मी यावर ठाम आहे. त्यानंतर त्यांनी शरद पवार हेच आमचे आधारवड आहेत, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.

ADVERTISEMENT

Amol Mitkari
Amol Mitkari
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पायलेटला हेपनोटाईज केलं गेलंय का?

point

'शरद पवार आमचे आधारवड'

point

काय म्हणाले अमोल मिटकरी?

Amol Mitkari : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला काही दिवस झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी एक अजितदादांच्या निधनावर संशय व्यक्त केला. मी अपघात न म्हणता याला घातपातच म्हणतो, मी यावर ठाम आहे. घातपात होण्यामागे अधिक फोकस काय असेल तर ते विमान आहे. विमान हे ना दुरुस्त होते, गेल्या एक वर्षांपासून त्यावर बंदी घालण्यात आली होती, तसेच ना दुरुस्ती विमान दादांना देण्यात आल्याचा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले की, शरद पवार हेच आमचे कुटुंब प्रमुख असून तेच आमचे आधारवड आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. 

हे ही वाचा : 'दादांच्या अपघाताआधी पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवण्यात आला..' अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?

'विमानाचा वेळेवर पायलट बदलला गेला'

पुढे अमोल मिटकरी म्हणाले की, विमानाचा वेळेवर पायलट बदलला गेला. पहिल्या दिवशी दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण प्रोग्राम बदलला त्यासंबंधित चौकशी सुरु आहे. व्हिआरएसच्या पायलटचा विमान डिसेंबर 2025 मध्ये काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली. तसेच या विमान कंपनीचे पायलेट अजमल कसाब सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का? मूळ पायलट संबंधित कंपनीने टेक ऑफसाठी दिलेला होता तो बदलला गेला. पुन्हा कपूर नावाचा पायलट तिथे आणला गेला. 

पायलेटला हेपनोटाईज केलं गेलंय का?

कपूर जिवंत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीनं सांगितली. यामुळे पायलेटला हेपनोटाईज केलं गेलंय का? असा प्रश्न उपस्थित केला. काहींना माझं बोलणं हास्यास्पद वाटत असेल, काही मत प्रकट करतील पण बारकावे तपासले जावेत. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार केला जाईल असं कोणीही बोलू नये. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलू नये, पक्षाच्या आमदारांनी देखील बोलू नये. कार्यकर्ते आणि लोकांची अशी भावना आहे की, अजितदादा दुर्दैवाने आपल्यात नाहीत, ती जागा सुनेत्रा वहिणींची आहे आणि ती जागा सुनेत्रा वहिणींची असून त्याच त्या जागेच्या हक्कदार आहेत. 

हे ही वाचा : मुंबई लोकलमध्ये बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात, व्हिडिओ आला समोर

'शरद पवार आमचे आधारवड'

यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले की, मी एका वेगळ्या पक्षाचा नेता आहे. तसेच रोहित पवार हे देखील एका वेगळ्या पक्षाचे नेते आहेत, पण सध्या शरद पवार हे पवार कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे आमच्यातील नेत्यांचे कुटुंबप्रमुख हे देखील शरद पवार आहेत, तेच आधारवड आहेत, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp