'दादांच्या अपघाताआधी पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवण्यात आला..' अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
Amol Mitkari : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली होती. त्याविषयी त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला. दादांचा घातपात झाला आहे यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीच्या पायलट्सचा 50-50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याची माहिती आम्हाला समजली. तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच या घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांना काही अमिष दाखवलं गेलंय का याचा तपास झाला पाहिजे.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दादांच्या अपघाताआधी पायलटचा 50 कोटींचा विमा उतरवण्यात आला.
अमोल मिटकरींचा दावा
Amol Mitkari : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली होती. त्याविषयी त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला. दादांचा घातपात झाला आहे यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीच्या पायलट्सचा 50-50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याची माहिती आम्हाला समजली. तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच या घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांना काही अमिष दाखवलं गेलंय का याचा तपास झाला पाहिजे.' अमोल मिटकरी अजून काय म्हणाले, जाणून घेऊया.
हे ही वाचा : अजित पवार यांच्या जागी आमदार कोण? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु
50 कोटींचा विमा का उतरवण्यात आला?
अमोल मिटकरी म्हणाले की, 'डिसेंबर 2025 मध्ये व्हीएसआर कंपनीच्या पायलट्सचा 50-50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याची माहिती आम्हाला समजली. तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच या घडामोडी घडल्या. ५० कोटीचा विमा उतरवूनव तुमच्या कुटुंबाची काळजी करु नका, आम्ही तुमचं सगळं बघतो असं अमीष दाखवलं गेलंय का या दृष्टीने तपास झाला पाहिजे.' तसेच पायलट्सना हिप्नोटाईज केले जाऊ शकते का या दृष्टीनेही तपास व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, 'विमानाचे पायलट्स अजमल कसाबसारखे हिप्नोटाईज केले होते का? कारण जो पायलट कंपनीने नेमला होता तो पायलट बदलला गेला. त्याच्या ऐवजी कपूर नावाचा पायलट आणला गेला. कपूर जीवंत असल्याची त्याची पत्नी सांगते आहे, त्यामुळे पायलटला हिप्नोटाईज केले जातात का याचीदेखील चौकशी झाली पाहिजे. कदाचित माझं मत अनेकांना हास्यास्पद वाटेल, पण यातील बारकावे शोधले गेले पाहिजेत.' तसेच या अपघातामागे व्हीएसआर कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
रोहित पवार यांची पत्रकार परिषद महत्त्वाची
10 फेब्रुवारी रोजी रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याविषयी बोलताना मिटकरी म्हणाले की, '10 फेब्रुवारी रोजी रोहित पवार अजितदादांच्या अपघाताबद्दलचे पुरावे दाखवणार आहेत. त्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासोबत देशाचं लक्ष लागलं आहे. आम्हालाही ती पत्रकार परिषद बघायची आहे. त्यांच्याकडे नेमके काय पुरावे आहेत ते बघायचं आहे. आम्ही भावनिक दृष्टिकोनातून बोलतो असं त्यांनी सांगितलं असलं तरी भावनिकता प्रत्येकाच्या मनात आहे. पण सत्य काय आहे याचा उलगडा ते करतील असं वाटतं. 12 तारखेला पक्षाच्या विलीनिकरणाबाबत दादांनी त्यांना काय सांगितलं होतं, दादांनी पवार साहेबांसोबत काय संवाद साधला होता याबाबत ते गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे त्यांची पत्रकार परिषद पहावी लागेल.'










