अजित पवार यांच्या जागी आमदार कोण? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु
Baramati assembly by-election : सर्वात आधी बारामती पोटनिवडणूकीची तयारी सुरु झालीय का? या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. प्रशासनानं यासंदर्भातील तयारी सुरु झाली असल्याची हिंट दिलीय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. हा कार्यक्रम काय आहे हे आधी बघुयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवार यांच्या जागी आमदार कोण?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु
Baramati assembly by-election : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात मोठी पोकळी निर्माण झालीये. राज्याने अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष तर गमावला. शिवाय, बारामतीतील जनतेने त्यांचा आमदार देखील गमावलाय. बारामतीला आता नव्या नेतृत्वाची देखील गरज असणार आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक कधी होणार असा सवाल विचारण्यात येत होता. या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडूनच मिळालं आहे. त्यामुळं आता बारामतीतून अजितदादांच्या नंतर कोण आमदार होणार? निवडणूक होणार का? आणि झाली तर कधी होणार? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात...
तर सर्वात आधी बारामती पोटनिवडणूकीची तयारी सुरु झालीय का? या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. प्रशासनानं यासंदर्भातील तयारी सुरु झाली असल्याची हिंट दिलीय. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. हा कार्यक्रम काय आहे हे आधी बघुयात.
पुणे जिल्ह्यातील 201–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये 201–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
हेही वाचा : प्रियकरासोबत पळून जाऊन लग्नं केलं, दहा महिन्यांतच केली आत्महत्या; तरुणीने का उचललं टोकाचं पाऊल?










