प्रियकरासोबत पळून जाऊन लग्नं केलं, दहा महिन्यांतच केली आत्महत्या; तरुणीने का उचललं टोकाचं पाऊल?

मुंबई तक

Crime News : एका 27 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांतच आपले आयुष्य संपवले आहे. राहत्या घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. दहा महिन्यांपूर्वी तिनं आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन विवाह केला होता. मात्र तिला काही महिन्यांतच आपला निर्णय चुकल्याचे लक्षात आले. तिला यातून मार्गही काढता आला असता, मात्र तिनं निराशेतून टोकाचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत पळून जाऊन लग्नं केलं

point

दहा महिन्यांतच केली आत्महत्या

point

तरुणीने का उचललं टोकाचं पाऊल?

Crime News : एका 27 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांतच आपले आयुष्य संपवले आहे. राहत्या घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. दहा महिन्यांपूर्वी तिनं आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन विवाह केला होता. मात्र तिला काही महिन्यांतच आपला निर्णय चुकल्याचे लक्षात आले. तिला यातून मार्गही काढता आला असता, मात्र तिनं निराशेतून टोकाचे पाऊल उचलले. मध्यप्रदेशातील इंदोरमधील ही घटना आहे. मोनिका पटेल असं या महिलेचं नाव असून ती विजयनगर परिसरातील कल्प कामधेनू नगरमध्ये राहात होती. 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मोनिकाचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांनी मोनिकाचा पती रितेश पटेल आणि सासू राधा पटेल यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला

लग्नानंतर शारीरिक व मानसिक त्रास

मोनिका आणि रितेश यांचा 10 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. रितेश रॅपिडो बाईक चालवून उदरनिर्वाह करायचा, तर मोनिका घरातच शिलाई काम करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती. मोनिकाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 महिन्यांपूर्वी मोनिका अचानक घरातून बेपत्ता झाली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती, मात्र काही काळानंतर तिने रितेशसोबत प्रेमविवाह केल्याचे समोर आले. मात्र हा विवाह तिच्यासाठी सुखाचा ठरला नाही. मोनिकाच्या बहिणीने आरोप केला आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासूने तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

म्हणून उचलले टोकाचे पाऊल

घटनेच्या दिवशी पती रितेशने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. कपडे आणण्याच्या किरकोळ वादातून मोनिकाशी भांडण झाले आणि त्यानंतर आपण घराबाहेर गेलो असता तिने हे पाऊल उचलले, असा दावा त्याने केला. मात्र, मोनिकाच्या माहेरच्या लोकांचे जबाब आणि प्राथमिक तपासात पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या प्रताडनेमुळे मोनिका प्रचंड तणावाखाली होती आणि अखेर याच छळाला कंटाळून तिने मृत्यूला कवटाळले, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp