रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला

मुंबई तक

Crime News : रील बनवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. रील बनवण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय तरुणीला खोटी फाशी घेतानाची रील बनववायची होती. यासाठी ती मोबाईल कॅमेऱ्यासमोर फाशी घेतानाचे नाटक करत असताना दोरीचा फास आवळला गेला आणि त्यात तिचा मृ्त्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला

point

4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला

Crime News : रील बनवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. रील बनवण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय महिलेला खोटी फाशी घेतानाची रील बनववायची होती. यासाठी ती मोबाईल कॅमेऱ्यासमोर फाशी घेतानाचे नाटक करत असताना दोरीचा फास आवळला गेला आणि त्यात तिचा मृ्त्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोहिनी असं या महिलेचं नाव असून उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्याची ती रहिवासी होती. सोशल मीडियातील प्रसिद्धीच्या हव्यासाोटी एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हे ही वाचा : तरुणाने अंधश्रद्धेला बळी पडून स्वत:च्या आईला संपवलं, परिसरात एकच गोंधळ

'असा' झाला दुर्दैवी अंत

घटनेच्या वेळी मोहिनी घरी एकटीच होती. तिचा पती जगदीश कामासाठी बाहेर गेला होता. दुपारी रील बनवण्याच्या नादात तिने घरातील छताच्या हुकला दोरी बांधली आणि आत्महत्येचा अभिनय करण्यासाठी मोबाईलचा कॅमेरा सुरु केला. मात्र, हा सीन शूट करत असताना तिचा तोल गेला आणि गळ्यातील फास प्रत्यक्षात घट्ट झाला. दुर्दैवाने तिला सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि यातच तिचा जीव गेला. काही वेळाने तिची चार वर्षांची मुलगी खोलीत आली असता, आपल्या आईला लटकलेल्या अवस्थेत पाहून तिने हंबरडा फोडला.

मृत्यूचे कारण अज्ञात

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपासात आणि मृत महिलेच्या चिमुरड्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी मोबाईलवर रील पाहत होती आणि तशाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक दृष्ट्या हा रील बनवताना झालेला अपघातच वाटत आहे. तरीही पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून त्यातील व्हिडिओंची तपासणी केली जात आहे. कुटुंबीयांनी मात्र या मृत्यूचे कारण 'अज्ञात' असल्याचे नमूद केले असून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.