तरुणाने अंधश्रद्धेला बळी पडून स्वत:च्या आईला संपवलं, परिसरात एकच गोंधळ
crime news : एका तरुणाने अंद्धश्रद्धेला बळी पडून स्वत:च्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि चिंतेचा विषय बनला आहे. घडलेल्या घटनेनुसार, ही घटना ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बेतनाटी पोलीस ठाणे परिसरातील कलाराफुलिया गावात घडल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंधश्रद्धेतून मुलाने आईला संपवलं
हत्येमागे आरोपीची मानसिकता कारणीभूत..?
Crime News : ओडिशाच्या मयूरभंग जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने अंद्धश्रद्धेला बळी पडून स्वत:च्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि चिंतेचा विषय बनला. घडलेल्या घटनेनुसार, ही प्रकरण ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बेतनाटी पोलीस ठाणे परिसरातील कलाराफुलिया गावात घडल्याचं वृत्त आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव तपन बारीक (वय 35) असे आहे. तर मृत आईचे नाव रायमणी सिंग (वय 48) असे आहे.
हे ही वाचा : मंदिरात जाते असं सांगून पत्नी गेली बॉयफ्रेंडसोबत पळून, नवऱ्याला समजताच जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये...
अंधश्रद्धेतून मुलाने आईला संपवलं
आपल्या आईवर कोणीतरी जादूटोना केल्याचा तपनला संशय आला होता. पत्नीवर वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी त्याने आईलाच जबाबदार धरले. याच मुद्द्यावरून कुटुंबात मोठा वाद झाला. सततच्या या वादाला कंटाळून पुत्नी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेली होती. काही दिवसांपासून ग्रामस्थांनी तपनचे वर्तन वाईट असल्याचं सांगितलं. मुलानेच आपल्याच आईला विनाकारक जबाबदार धरले होते. बुधवारी आई आणि मुलामध्ये वाद झाला होता. रागाच्याभरात तपनने त्याच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा : दगडाने डोकं ठेचून महिलेला संपवलं, नग्न अवस्थेत मृतदेह रस्त्यावर आढळला, नेमकं काय घडलं?
हत्येमागे आरोपीची मानसिकता कारणीभूत..?
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हत्येतील हत्यारे जप्त करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना अंधश्रद्धेमुळे घडली. आरोपीची मानसिकता यामागे कारणीभूत असू शकते याचा पोलीस तपास करत आहेत. स्थानिकांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.










