मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपने उमेदवार ठरवला, 'या' नगरसेविकेला दिली संधी!

मुंबई तक

Ritu Tawade : रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन वेळेस नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत त्या सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

ADVERTISEMENT

Ritu Tawade was new mayor of mumbai bmc bjp announce mahapaur candidate name sanjay ghadi deputy mayor from shiv sena Maharashtra Politics Marathi News
BJP Mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून कोणाला संधी?

point

उपमहापौर म्हणून शिंदेसेनेच्या संजय घाडी यांची निवड होणार

Ritu Tawade, Mumbai Mahapalika Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून आता अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी शिंदेसेना (शिंदे गट) कडून देखील नाव जाहीर करण्यात आलं आहे. याचा अर्थ मुंबईत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. पुढील सव्वा वर्षांचा कार्यकाळ शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी दोन महिला नगरसेविकेंच्या नावावर जोरदार चर्चा सुरू होती. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

अखेर भाजपकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी शिंदेसेना (शिंदे गट) कडून संजय शंकर घाडी यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. पुढील सव्वा वर्षांचा कार्यकाळ संजय घाडी उपमहापौर म्हणून भूषवणार आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन्ही नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेरीस रितू तावडे यांनी बाजी मारली.

हेही वाचा : जालना हादरलं, भर चौकात तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करुन खून; शहरात खळबळ

कोण आहेत रितू तावडे?

रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन वेळेस नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. महापौरपदाच्या शर्यतीत त्या सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

रितू तावडे या मुंबईतील सक्रिय आणि अनुभवी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी एस.वाय.बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले असून मे. आर.आर. इंटरप्राईजेस या व्यवसायाशी त्या संबंधित आहेत. त्या हिंदू-मराठा समाजातील असून  त्यांचे पती राजेश मधुकर तावडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना दोन मुले असून मुलगी अॅडव्होकेट मधुरा राजेश तावडे, तर मुलगा यश राजेश तावडे हा कम्प्युटर इंजिनीयर (बी.ई.) आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp