'महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनामागे RSS', प्रकाश आंबेडकरांचा संताप, भुजबळांनी अमित शाहांना लिहिलं पत्र
Mahatma Jyotiba Phule's statue : तेलंगणामध्ये काही समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाज कंटकांनी हा प्रकार केलाय. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळलीय. संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तेलंगणामध्ये समाजकंटकांकडून महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न
प्रकाश आंबेडकर यांचा संताप
छगन भुजबळ यांचं ट्विट
Mahatma Jyotiba Phule's statue : तेलंगणामध्ये काही समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाज कंटकांनी हा प्रकार केलाय. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळलीय. संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. या सर्व घटनेवर महाराष्ट्रातही संताप व्यक्त होतोय. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.
हे ही वाचा : 'राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शरद पवार कुटुंब प्रमुख, तेच आमचे...', अमोल मिटकरी यांचं वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांचा संताप
प्रकाश आंबेडकरांनी संताप करत या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केलाय. "हा केवळ महात्मा जोतिबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. संघाचं केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवरील आघात आहे," असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना तेलंगणात अशा घटना वारंवार घडत असताना तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात, असा सवालही उपस्थित केलाय.
तर, छगन भुजबळ यांनी या प्रकरणी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. भुजबळांनी म्हटलंय की, "हा हल्ला अत्यंत निंदनीय, गंभीर गुन्हा आहे. या घटनेमुळे कोट्यवाधी समर्थकांच्या भावना दुखावल्या असून सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतावादी विचारधारेवर आघात आहे," असं छगन भुजबळ म्हणाले.
“महात्मा ज्योतिबा फुले या महान समाज सुधारकांच्या प्रतिमेवर हल्ला करणे हे सामाजिक वैमनस्यता आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न आहे. याचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार केला जाणार नाही. काही समाजकंटक आजही सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण आणि समतांच्या प्रतिकांना घाबरलेले आहेत. त्यामुळे माझे तुम्हाला निवदेन आहे की या घटनेची दखल घेण्यात यावी”, असं निवेदन छगन भुजबळांनी केलं आहे.










