सरकारी वकील बदला, संतोष देशमुख हत्या प्रकरणातून उज्ज्वल निकमांना हटवण्याची मागणी
Santosh Deshmukh murder case hearing : आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, तसेच निष्पक्ष न्यायप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. या कारणास्तव तातडीने त्यांची नियुक्ती रद्द करून अन्य सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नकोत"
आरोपींचा कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं
Santosh Deshmukh murder case hearing : बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आज (दि.19) बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावे, अशी मागणी आरोपींकडून न्यायालयात करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी सुनावणीदरम्यान हा अर्ज सादर केल्याने खळबळ उडाली आहे.
सरकारी वकील उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी निगडित, आरोपींचा कोर्टात अर्ज
आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, तसेच निष्पक्ष न्यायप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. या कारणास्तव तातडीने त्यांची नियुक्ती रद्द करून अन्य सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आली आहे.
आजची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणाची ही पहिलीच सुनावणी ठरली. या सुनावणीत प्रकरणावर आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यानंतर प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांची सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.










