छत्रपती संभाजीनगर: मित्राने बोलवल्यावर लॉजवर गेली, पण दारूच्या नशेत भलत्याच रूममध्ये शिरली अन् विवाहितेवर लैंगिक अत्याचार!
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या सांगण्यावरून लॉजवर गेली, पण चुकून भलत्याच रूममध्ये शिरली
तिघांकडून विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार
छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं वृत्त आहे. पीडिता तिच्या मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती, पण त्यावेळी ती चुकून दुसऱ्याच रूममध्ये शिरली आणि तिथे उपस्थित असलेल्या तीन नराधमांनी तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींवर कारवाई करत त्यांना अटक केल्याची माहिती आहे.
मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला एका खाजगी कंपनीत कार्यरत असून तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्या मित्राकडे पैशांची मागणी केली होती. त्या मित्राने पीडितेला रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये पैसे देण्यासाठी बोलवलं. त्यावेळी, दोघांनी हॉटेलमधील 105 नंबर रूम बुक केली. पीडितेने तिच्या मित्रासोबत मद्यप्राशन केलं आणि एकत्र जेवण सुद्धा केलं. त्यानंतर, महिला फोनवर बोलत खोलीतून बाहेर पडली.
हे ही वाचा: फक्त एक SMS अन् पुण्यातील आर्मी कर्नलसोबत होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
भलत्याच रूममध्ये शिरली अन् सामूहिक बलात्कार
रात्री जवळपास 11 वाजताच्या सुमारास फोनवर बोलणं झाल्यानंतर ती पुन्हा खोलीत परत जाण्यासाठी गेली आणि त्यावेळी तिने चुकून 105 रूम नंबर ऐवजी 205 रूम नंबरचा दरवाजा ठोठावला. त्या रूममध्ये तीन तरुण मद्यप्राशन करत होते आणि पीडितेला पाहताच त्यांनी तिला खोलीत ओढलं. तिन्ही आरोपींनी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, त्यावेळी नराधमांनी तिला दारू देखील पाजल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: 'माझा मुलगा 12 वर्षांपासून कोमात, त्याला मरण द्या', पालकांची न्यायालयात मागणी; आता न्यायमूर्ती प्रत्यक्ष जाणार अन्...
आरोपी तरुणांना अटक
आरोपींनी पीडितेने जबरदस्तीने दारू पाजली आणि रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास, ती महिला कशीबशी आरोपींच्या तावडीतून सटून बाहेर पडली. त्यानंतर, तिने तातडीने वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिन्ही आरोपी तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. घनश्याम भाऊलाल राठोड (27), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (25) आणि किरण लक्ष्मण राठोड (25) अशी आरोपींची ओळख समोर आली आहे.










