तुळजापुरात बारजवळ दोन गटांत हाणामारी; अज्ञाताकडून गोळीबार
Tuljapur News : तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवरील सारंग बारसमोर शनिवारी (दि. 07) सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुळजापुरात बारजवळ दोन गटांत हाणामारी
अज्ञाताकडून गोळीबार
Tuljapur News : तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवरील सारंग बारसमोर शनिवारी (दि. 07) सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे.
हे ही वाचा : बीड : नाव चुकीचे सांगितले, पण आडनावावरुन सगळं समोर; पीएसआय पल्लवी जाधव यांनी कसा रोखला 'तो' बालविवाह?
गोळीबार कशासाठी करण्यात आला?
घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथकही पोहोचले होते. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली आहे. गोळीबार नेमका कशासाठी करण्यात आला, कोणत्या दिशेने गोळी झाडण्यात आली तसेच संशयित कोण आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात अवैध शस्त्रसाठा व गावठी कट्ट्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : भाजपच्या माजी नगरसेवकाने चौथे लग्न केले; नाराज मुलाने सावत्र आईला भर रस्त्यातच भोसकले










