कल्याण : एपस्टीन फाइल्सप्रकरणी काँग्रेसचा चक्का जाम, मोदींच्या राजीनाम्याची मागणी; 'तो' आंदोलक तात्या विंचूच्या वेशभूषेत का आला?
Kalyan News : सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान या आंदोलनात एक कार्यकर्ता तात्या विंचूच्या वेशभूषेत आला होता. जो उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एपस्टीन फाइल्सप्रकरणी काँग्रेसचा चक्का जाम
मोदींच्या राजीनाम्याची मागणी
'तो' आंदोलक तात्या विंचूच्या वेशभूषेत का आला?
Kalyan News : सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान या आंदोलनात एक कार्यकर्ता तात्या विंचूच्या वेशभूषेत आला होता. जो उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.
हे ही वाचा : बीड : नाव चुकीचे सांगितले, पण आडनावावरुन सगळं समोर; पीएसआय पल्लवी जाधव यांनी कसा रोखला 'तो' बालविवाह?
आक्षेपार्ह पोस्टर्स झळकले
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात 'एपस्टीन –मोदी, भाई–भाई' असे आक्षेपार्ह पोस्टर्स झळकत होते. याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलन उग्र होत असल्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव नवीन सिंग, विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आंदोलनात अवतरला 'तात्या विंचू' आणि 'गोरिला'
एपस्टीन फाईलमध्ये भारतातील काही दिग्गज लोकांची नावं आली आहेत. यावरुन काँग्रेसन भाजप सकरकारला धारेवर धरलं आहे. याविषयी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निदर्शनं सुरु आहेत. कल्याणमध्येही काँग्रेसने चक्का जा आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान सुप्रसिद्ध मराठी चित्रपट 'झपाटलेला' मधील प्रसिद्ध पात्र तात्या विंचू यांच्या वेशभूषेत एक आंदोलक दिसून आला, जो उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. याशिवाय आंदोलनात एक आंदोलक गोरिलाच्या वेशभूषेत आला होता.