लग्नाचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब केक घेऊन रात्रभर वाट पाहत बसलं, पहाटे मुलाचा मृतदेहच घराकडे आला!
Delhi Accident News : घरात सगळे जण मध्यरात्री केक कापण्याची तयारी करत होते. मात्र अर्धा तास उलटूनही कमल घरी पोहोचला नाही. फोनही बंद झाला. काळजीने कुटुंब अस्वस्थ झालं. त्यानंतर सुरू झाली अखंड शोधमोहीम. आधी कमलच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. तेथून तो निघून गेल्याचं सांगण्यात आलं. मग एकामागून एक पोलीस ठाण्यांचे दरवाजे ठोठावले. रस्तोरस्ती त्याच्या दुचाकीचा शोध घेतला. संपूर्ण रात्र कुटुंब रस्त्यावर भटकत राहिलं. पण कुठलाही धागा मिळाला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब केक घेऊन रात्रभर वाट पाहत बसलं
पहाटे मुलाचा मृतदेहच घराकडे आला!
Delhi Accident News : मुलाचा लग्नाचा वाढदिवस असल्याने दिल्लीतील एक कुटुंब केक घेऊन बसलं आणि त्याच्या येण्याची वाट पाहात होतं. त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेनबत्त्या देखील पेटवल्या होत्या. जेवणाची ताट मांडायलाही सुरुवात करणार होते. मात्र, हा आनंदाचा क्षणाचा विचार सुरु असताना कुटुंबियांसाठी ती रात्र सर्वात भयावह बनून आली. कारण कमल ध्यानी या 25 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
कमल हा कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण. शुक्रवारी रात्री 12.50 वाजता त्याने आपल्या जुळ्या भावाला करणला फोन करून सांगितलं की, “15 मिनिटांत घरी पोहोचतोय. आईला जेवण बनवायला सांग.” घरात सगळे जण मध्यरात्री केक कापण्याची तयारी करत होते. मात्र अर्धा तास उलटूनही कमल घरी पोहोचला नाही. फोनही बंद झाला. काळजीने कुटुंब अस्वस्थ झालं. त्यानंतर सुरू झाली अखंड शोधमोहीम. आधी कमलच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. तेथून तो निघून गेल्याचं सांगण्यात आलं. मग एकामागून एक पोलीस ठाण्यांचे दरवाजे ठोठावले. रस्तोरस्ती त्याच्या दुचाकीचा शोध घेतला. संपूर्ण रात्र कुटुंब रस्त्यावर भटकत राहिलं. पण कुठलाही धागा मिळाला नाही.
दरम्यान, पहाटे पोलिसांचा फोन आला. कमलचा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात आलं. जनकपुरी परिसरात दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी पाइपलाइनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह आणि चिखलात अडकलेली दुचाकी आढळली. अपघाताच्या वेळी कमलच्या डोक्यावर हेल्मेट होतं. ही दुचाकी त्याने स्वतःच्या बचतीतून खरेदी केली होती.
हेही वाचा : मंदिरात एकटी आल्याचं पाहिलं, अन् 3 तरुण 'दिल ना दिया' म्हणत मागे लागले; शेवटी तरुणीने काय केलं? पाहा VIDEO










