पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा? आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं
Cancer patient wife murdered by husband contract killing : तपासात समोर आलेल्या माहिती नुसार, मृत महिलेचा पती राहुल शर्मा यानेच आपल्या पत्नी रीता शर्मा हिची हत्या करण्याचा कट रचला होता. राहुलने आपल्या दोन कर्मचार्यांना शेरअली उर्फ शेरा आणि फिरोज यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. घरगुती वाद, पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी होणारा मोठा खर्च आणि आई व पत्नीमधील सततचे भांडण, या सगळ्यामुळे राहुल पत्नीपासून सुटका मिळवू इच्छित होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा?
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं
Cancer patient wife murdered by husband contract killing : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी हत्या प्रकरण समोर आली आहे. कॅन्सरने पीडित असलेल्या एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या हत्येचा कट स्वतः तिच्या पतीने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पत्नीच्या हत्येसाठी पतीने सुपारी दिल्याची बाब समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती राहुल शर्मा याच्यासह त्याचे दोन साथीदार शेरअली उर्फ शेरा आणि फिरोज यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकूही जप्त केले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहादुरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर रुस्तमपूर गावातील आहे. 2 फेब्रुवारीच्या रात्री एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. सुरुवातीला ही घटना चोरीदरम्यान झालेली हत्या असल्याचा बनाव करण्यात आला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले गेले होते, त्यामुळे चोरीचा संशय अधिक बळावला. मात्र, पोलीस तपास पुढे गेला आणि घटनेमागचा भयंकर कट उघडकीस आली.
तपासात समोर आलेल्या माहिती नुसार, मृत महिलेचा पती राहुल शर्मा यानेच आपल्या पत्नी रीता शर्मा हिची हत्या करण्याचा कट रचला होता. राहुलने आपल्या दोन कर्मचार्यांना शेरअली उर्फ शेरा आणि फिरोज यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. घरगुती वाद, पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी होणारा मोठा खर्च आणि आई व पत्नीमधील सततचे भांडण, या सगळ्यामुळे राहुल पत्नीपासून सुटका मिळवू इच्छित होता.
हेही वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान, पाहा कुठे कुठे पार पडतंय मतदान?










