Personal Finance: जुनं घर विकल्यावर Capital Gain Tax कसा वाचवाल?

रोहित गोळे

Capital Gains Tax Saving: घर विकल्यानंतर मिळालेल्या नफ्यावर Capital Gain Tax भरावा लागू शकतो. मात्र, Income Tax Act मधील काही तरतुदींचा योग्य वापर केल्यास हा कर कायदेशीररित्या कमी किंवा पूर्णपणे वाचवता येतो.

ADVERTISEMENT

personal finance how can you save on capital gains tax after selling a house know these 8 legal ways
Personal Finance
Google CTA

Personal Finance tips for Capital Gains Tax Saving: घर विकल्यानंतर नफा झाला तर त्यावर Capital Gain Tax भरावा लागतो. अनेकांना वाटते की घर विकले म्हणजे मिळालेल्या संपूर्ण रकमेवर कर भरावा लागतो. प्रत्यक्षात तसे नसते. कर हा प्रामुख्याने नफ्यावर (Capital Gain) लागू होतो आणि आयकर कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत ज्यामुळे हा कर कमी किंवा पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

घर विकण्यापूर्वी योग्य आर्थिक नियोजन केल्यास लाखो रुपयांचा कर वाचू शकतो.

Capital Gain Tax म्हणजे काय?

एखादी मालमत्ता विकून तिच्या खरेदी किंमतीपेक्षा जास्त किंमत मिळाल्यास जो नफा होतो त्याला Capital Gain म्हणतात. याच नफ्यावर कर आकारला जातो.

1. नवीन घर खरेदी करून कर वाचवा (Section 54)

जर तुम्ही निवासी घर विकले असेल, तर ठरावीक अटी पूर्ण करून दुसरे निवासी घर खरेदी किंवा बांधल्यास Capital Gain Tax मधून सूट मिळू शकते.