मुंबईची खबर: मुंबई ते पुणे प्रवास केवळ दीड तासात शक्य होणार! वाहतूक मंत्र्यांनी केली नव्या एक्स्प्रेसवे प्रोजेक्टची घोषणा...
संबंधित योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे दुसरा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा एक नवीन एक्सप्रेसवे आणि पुणे क्षेत्रातील एलिव्हेटेड कॉरिडॉर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केवळ दीड तासात मुंबई ते पुणे प्रवास करता येणार!
वाहतूक मंत्र्यांनी केली नव्या एक्स्प्रेसवे प्रोजेक्टची घोषणा...
Mumbai News: केंद्र सरकारने रस्त्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने 1.5 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेची घोषणा केली. राज्यभरातील प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे आणि आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे, हाच या योजनेचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे दुसरा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा एक नवीन एक्सप्रेसवे आणि पुणे क्षेत्रातील एलिव्हेटेड कॉरिडॉर.
मुंबई ते पुणे प्रवास केवळ 90 मिनिटांत शक्य
प्रस्तावित मुंबई-पुणे एक्सप्रेसवे II हा 130 किलोमीटर लांबीचा असून त्याला अंदाजे 15,000 कोटी खर्च येणार असल्याची माहिती आहे. या नवीन कॉरिडॉरमुळे प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास केवळ 90 मिनिटांत करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे-2 मुळे वाहतूक कोंडी कमी होईल. नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनपीए बंदराजवळील पागोटे ते पनवेल चौक यांना जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, या एक्सप्रेसवेमुळे मुंबई आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल. तसेच नेहमीचे प्रवासी, लॉजिस्टिक्स कंपन्या आणि आपत्कालीन सेवांना याचा फायदा होईल.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेतील नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! 'बँक ऑफ इंडिया' मध्ये निघाली भरती... कसा कराल अर्ज?
नवीन एक्सप्रेसवे नेटवर्कमुळे प्रवासी मुंबई ते पुणे मार्गे बेंगळुरू पर्यंतचा प्रवास फक्त 5.5 तासांत करू शकतील. यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतातील व्यावसायिक प्रवास, पर्यटन आणि शहरांतर्गत व्यापार वाढण्याची अपेक्षा आहे.










