मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला, बॉडी नग्न अवस्थेत सापडली; चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर
Mumbai Crime : मुलीने आईचा मोबाईल तपासला असता काही खासगी चॅट्स आढळून आल्या. या संदेशांमधून महिलेचे दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचे संकेत मिळाले. या पार्श्वभूमीवर आत्महत्येमागील कारणांबाबत संशय अधिक गडद झाला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : दीरासमोर विवाहितेने गळफास घेतला
बॉडी नग्न अवस्थेत सापडली
चॅटींगमधून अनैतिक संबंध समोर
Mumbai Crime : मुंबईतील वडाळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातच असलेल्या दिराच्या उपस्थितीत एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणात महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल चॅटमधून महिलेचे दिरासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे संकेत मिळाल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
विवाहितेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतीक्षानगर परिसरात एक कुटुंब वास्तव्यास होते. पती, पत्नी आणि त्यांची 25 वर्षांची मुलगी असे हे कुटुंब असून, काही महिन्यांपासून पतीचा आत्येभाऊ (दीर) त्यांच्याच घरी राहत होता. घटनेच्या दिवशी पती आणि मुलगी दोघेही सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या वेळी घरात महिला आणि दीर एवढेच होते.
सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर तिला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. तिने वारंवार दार ठोठावले; मात्र आतून कोणतीही हालचाल झाली नाही. शेजाऱ्यांनीही मदतीसाठी दार वाजवले, तरी प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी दिराने दरवाजा बाहेरून ढकलून उघडण्याचा सल्ला देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बराच वेळ गेल्यानंतरच दरवाजा उघडण्यात आला.










