Govt Job: सरकारी बँकेतील नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! 'बँक ऑफ इंडिया' मध्ये निघाली भरती... कसा कराल अर्ज?
'बँक ऑफ इंडिया'कडून जनरल बँकिंग ऑफिसर (GBO) शाखेत क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरकारी बँकेतील नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार!
'बँक ऑफ इंडिया' मध्ये निघाली भरती...
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Bank of India Recruitment 2025: बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 'बँक ऑफ इंडिया'कडून जनरल बँकिंग ऑफिसर (GBO) शाखेत क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 20 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणार असून उमेदवार 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
तब्बल 514 पदांसाठी भरती जाहीर
क्रेडिट ऑफिसर-GBO(SMGS-IV): 36 पदे
क्रेडिट ऑफिसर-GBO(MMGS-III): 60 पदे
क्रेडिट ऑफिसर-GBO(MMGS-II): 418 पदे
काय आहे पात्रता?
क्रेडिट ऑफिसर MMGS-II आणि III (GBO) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही विषयात किमान 60 टक्के गुणांसह ग्रॅज्युएशन (पदवी) डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे CA/CFA/CMA-ICWA किंवा MBA/PGDBM/बँकिंग/ फायनान्स अशा क्रेडिट संबंधित कोणत्याही क्षेत्रात 2 वर्षांचं PG असणं गरजेचं आहे. क्रेडिट ऑफिसर SMGS-IV (GBO)पदांसाठी ग्रॅज्युशनच्या डिग्रीसह MBA/PGDBM अशा कोणत्याही फील्डमध्ये 2 वर्षांची फूल टाइम मास्टर्स डिग्री किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून CA/CFA/CMA-ICWA असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा: महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार! मित्राने अश्लील व्हिडीओ शूट केले अन्...
वयोमर्यादा
या भरतीसाठी, पदांनुसार उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.










