रॅपिडो नाही, तर उबेर चालकाने कल्याणमधील तरुणीला निर्जनस्थळी नेलं अन् अत्याचार करण्याचा प्रयत्न
Kalyan Crime : दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. संबंधित चालक हा रॅपिडोचा असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, हा चालक रॅपिडोचा नसून उबेर चालक असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रॅपिडो नाही, तर उबेर चालकाने केला तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
कल्याणमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Kalyan Crime : कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना समोर आली होती. जीमला जाण्यासाठी ऑनलाइन दुचाकी सेवा बुक केलेल्या एका तरुणीला संबंधित चालकाने निर्जनस्थळी नेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. मात्र, तरुणीने आरडाओरडा करत स्वत:ची सुटका करुन घेतली होती. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून रस्त्यावरच मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. संबंधित चालक हा रॅपिडोचा असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, हा चालक रॅपिडोचा नसून उबेर या कंपनीचा असल्याचं समोर आलं आहे.
आरोपीला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अधिकची माहिती अशी की, दि 13/12/2025 रोजी 19.00 वाजताच्या सुमारास कल्याणमधील एका तरुणीने (वय 26 वर्ष) जिममध्ये जाण्यासाठी उबेर अॅप वरुन मोटार सायकल बुक केली होती. मात्र, उबेर चालक (एक्सेस 125 स्कूटर नंबर MH04/MM/3365) सिद्धेश संदीप परदेशी (वय 19 वर्षे) याने मुलीला रिसीव्ह करुन निश्चितस्थळी न सोडता सिंडिकेट पोलीस वसाहतीत अंधाऱ्या रस्त्याने निर्जनस्थळी नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच तिने गाडीवरून उडी मारली. मात्र, उबेर चालकाने तिच्या हातास पकडून विनयभंग केला. तसेच तिच्या तोंडात माती कोंबून चाकूचा धाक दाखवून तिचे पर्स मधून 1000 रुपये जबरीने काढून घेतले. सदर प्रकरणात गुन्हा नोंद क्र 1232/2025 कलम 309 (6), 74, 324(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आलेली असून त्यास मा. न्यायालयाने दिनांक 18/12/2025 रोजी पर्यंत पोलीस काठडी मंजूर केलेली आहे.
घटनास्थळी आरोपीला नागरिकांकडून चोप
दरम्यान, घटनास्थळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तरुणीने घाबरून न जाता प्रसंगावधान राखले. तिने स्वतःचा बचाव करत जोरजोरात मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आसपासच्या भागातील नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीकडून संपूर्ण प्रकार समजून घेतल्यानंतर संबंधित चालकाला पकडून ताब्यात घेतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चालकाला चोप दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या










