बुरखा न घालताच मुलांसह पत्नी माहेरी गेली, पतीनं थेट गोळी झाडून संपवलं, नंतर मृतदेह घरातच पुरले

मुंबई तक

crime news : पतीने आपल्याच बायका मुलांना बेदम मारहाण केली आणि नंतर खोलीतील जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना घडली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिघांचीही हत्या करून मृतदेह घरात पुरल्याचा कबुलीनामा

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : पतीने आपल्याच बायका मुलांवर गोळीबार करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंतर मृतदेह खोलीतील जमिनीत पुरल्याचे सांगण्यात येत आहे. खोदण्यात आलेला हा खड्डा तब्बल 9 फूट खोल असल्याचे वृत्त समोर आले. हत्येमागील कारण आता समोर आलं आहे. पत्नी ही आपल्या मुलाला घेऊन बुरखा न घालताच माहेरी गेली होती. हाच राग मनात ठेऊन पतीनं असं भयानक कृत्य केलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात घडली, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी 'या' राशीतील लोकांना मिळणार यश, काही राशीतील लोकांनी आरोग्याची घ्या काळजी

नेमकं काय घडलं? 

हिंदुस्थान वृत्तानुसार, ही घटना शामली जिल्ह्यातील कंधला पोलीस ठाणे परिसरातील गढी दौलत येथे घडली होती. याच भागातील रहिवासी फारूख याला पाच मुलं आहेत. तो त्याच्या कुटुंबासह वेगळ्या घरात राहत होती. पत्नीचं नाव ताहिरा (वय 32), तसेच आफरिन (वय 12) आणि सरीन (वय 5) अशी त्यांची नावे आहेत. या दोन मुली 10 डिसेंबरपासून बेपत्ता होत्या.

तिघांचीही हत्या करून मृतदेह घरात पुरल्याचा कबुलीनामा

फारूखच्या वडिलांनी मंगळवारी सायंकाळी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नंतर त्यांना घटनेची माहिती दिली. गावातील एका प्रमुख व्यक्तीने एक महिला आणि दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी फारूखला ताब्यात घेतलं आणि त्यांची कठोर कारवाई केली, नंतर तिघांचीही हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याचा कबुलीनामा दिला होता.

मुलांसह पत्नीची हत्या मिच केल्याचं त्याने सांगितलं होतं. नंतर त्याने मृतदेह घरातील जमिनीत खड्डा खोदून पुरण्यात आला होता. मंगळवारी आरोपीने या खुनाचा कबुलीनामा दिला होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिसांनी घराची तपासणी केली, तिन्ही मृतदेह घरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पुरण्यात आले होते.या प्रकरणात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp