महिलेसोबत हॉटेलमध्ये शरीरसंबंध, नंतर प्रेयसीकडून लग्नाची मागणी अन् वाद, प्रियकराचं गुप्तांग छाटून...

मुंबई तक

crime news : एका हॉटेलमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी खुलासा केला की, महिलेची हत्या तिचा प्रियकर अमित निषादने केली होती.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

point

तिच्या चेहऱ्यावर जखमा

crime news : एका हॉटेलमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी खुलासा केला की, महिलेची हत्या तिचा प्रियकर अमित निषादने केली होती. ते हॉटेलच्या खोलीत वेळ घालवण्यासाठी आले होते. तिथे असताना महिलेनं अमितवर लग्न करण्यास दबाव आणला होता. भांडणानंतर महिलेनं त्याचं गुप्तांग छाटलं होतं. संतापलेल्या अमितने तिचा गळा दाबून खून केला. ही घटना पंजाबमधील लुधियांना येथील हॉटेलमध्ये घडली आहे.

हे ही वाचा : पुण्यातील 'या' भागात सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी चक्र फिरवली अन् झाला पर्दाफाश, असा घेतला शोध

अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

शनिवारी सायंकाळी महिलेचा मृतदेह हा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि तिच्या नाकातून रक्त येत होते. पोलिसांनी रात्री उशिराने मेहरबन गाव परिसरात छापा टाकण्यात आला आणि नंतर आरोपीला अटक करण्यात आली. रात्री 12:30 जानेवारीपर्यंत पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांना माहिती होती की महिलेची हत्या करणारा पुरुष मेहरबन गाव परिसरात गेला होता.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सेफ ऑफ सिटी कॅमेरे तपासले आणि अखेर आरोपीला अटक केली. या प्रकरणात डीसीपी रुपिंदर सिंग यांनी सांगितलं की, आरोपीची ओळख अमित निषाद अशी झाली होती. अमितची ओळख मृत महिला रेखासोबत झाली होती आणि तो तिच्यासोबत दाना मंडी येथील इंडो-अमेरिकन हॉटेलमध्ये गेला होता. त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि सुमारे तीन तास राहिल्यानंतर, अमित निषाद हा खोलीतून एकटाच बाहेर पडला होता.

जेव्हा हॉटेल मॅनेजरने त्याला काही सवाल केले असता, त्याने सांगितलं की तो जेवण आणण्यासाठी जात आहे. तो गेल्यानंतर बराच वेळ परतला नाही, तेव्हा मॅनेजर हा खोलीत गेला आणि त्याला मुलीचा मृतदेह रक्ताळलेल्या स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणात डीसीपी रुपिंदर म्हणाले की, रेखा तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिला दोन मुलं देखील होती. अमित आणि रेखा अनेक दिवसांपासून एकमेकांचे मित्र होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp