पुण्यातील 'या' भागात सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी चक्र फिरवली अन् झाला पर्दाफाश, असा घेतला शोध
Pune Crime : पुणे शहरातील अवैधपणे सुरु असलेला देहव्यापार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले. हे प्रकरण येवलेाडी परिसरात दिसू लागल्याचं दिसू लागलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलींना वैश्यव्यवसायात ढकलण्यास भाग पाडलं
कोंढवा पोलिसांनी सापळा रचत केली मोठी कारवाई
Pune Crime : पुणे शहरातील अवैधपणे सुरु असलेला देहव्यापार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले. हे प्रकरण येवलेाडी परिसरात दिसू लागल्याचं दिसू लागलं आहे. तसेच कोंढवा बोपदेव घाटाजवळील एका लॉजमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या कारवाईत पश्चिम बंगालमधीलव दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आणि नंतर पोलिसांनी लॉजच्या मालकाला अटक केल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : जालन्यात 32 वर्षीय तरुणाची नदीत उडी मारत आत्महत्या, मृतदेह तरंगत आला वर
मुलींना वैश्यव्यवसायात ढकलण्यास भाग पाडलं
पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी सासवड रोडवरील बोपदेव घाटातील परिसरातील हॉटेल साई बालाजी लॉजिंग नावाचे लॉज आहे. रवी छोटे गौडा (वय 46) आणि त्याचा कर्मचारी सचिन प्रकाश काळे (वय 40) हे पैशांसाठी इतर राज्यातील मुलींना वैश्यव्यवसायात ढकलण्यास भाग पाडत होते. बाहेरून संबंधित लॉज हा एखाद्या सामान्य लॉजप्रमाणे वाटतो, पण हा लॉज बेकायदेशीर आहे.
कोंढवा पोलिसांनी सापळा रचत केली मोठी कारवाई
या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी आपल्या पथकांना घटनास्थळी दाखल करून गस्त घालण्यास सांगितली. संबंधित प्रकरणाची माहिती पडताळणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण याच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता. दरम्यान, पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला एका लॉजमध्ये पाठवले होते आणि छापा टाकण्यात आला होता.
हे ही वाचा : लातूर हादरलं! पतीने महिलेसोबत बोलतानाचे चॅट्स पत्नीनं पाहिलं, संतापलेल्या आरतीने दोरीने गळा आवळत संपवलं जीवन
दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात दोन महिलांना वाचवले आणि पश्चिम बंगालच्या रहिवासी असल्याची ओळख पटवून दिली. या प्रकरणात चिथावणारा हा लॉज मालकच आहे, त्याचं नाव मालक रवी गौडा आणि कामगार सचिन काळे यांना बेड्या टोकल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध 'पिटा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










