शेतकऱ्याने कंबोडियाला जाऊन का विकली किडनी? हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी...
चंद्रपूरच्या शेतकऱ्यानं कंबोडियाला जाऊन किडनी विकल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. सावकाराचं एक लाखाचं कर्ज 74 लाखांवर गेलं होत.. त्यामुळे सावकाराच्या सल्ल्यानंच किडनी विकली असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरच्या शेतकऱ्यानं कंबोडियाला जाऊन किडनी विकली. सावकाराचं एक लाखाचं कर्ज ७४ लाखांवर गेलं. होत नव्हतं सगळं गेलं. सावकाऱाच्या सल्ल्यानंच किडणी विकली. हे कुठं घडलंय तर आपल्या महाराष्ट्रात. जिथं शेतकऱ्यांसाठी अनेक हजार कोटींची गलेलठ्ठ पॅकेजेस सत्ताधारी घोषित करतात.
हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी
होय ही अंगावर काटा आणणरी घटना घडलीय चंद्रपूरमध्ये. जिथून जवळच राज्याचे मुख्यमंत्री राहतात. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातलं मिंथूर गाव. या गावातील रोशन कुडे नावाचे हे शेतकरी. बेकायदेशीर सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याने आपली किडनी ₹८ लाखांना विकल्याचा दावा केलाय.
सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी त्याची किडनी विकावी लागली. आता रोशन या सावकारांच्या जाळ्यात कसे अडकले बघा. ज्यामुळं त्यांना किडनी विकावी लागलीय.










