परीक्षा देऊन घराकडे निघालेल्या मुलीला ओसाड ठिकाणी नेलं, अल्पवयीन विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाचा बलात्कार

मुंबई तक

Crime News : या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी कसाबसा घरी पोहोचली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय हादरले आणि तात्काळ तिला घेऊन मखदुमपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे पीडितेने रडत रडत ऑटोचालकाने केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

परीक्षा देऊन घराकडे निघालेल्या मुलीला ओसाड ठिकाणी नेलं

point

अल्पवयीन विद्यार्थीनीवर रिक्षा चालकाचा बलात्कार

Crime News : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, परीक्षा देऊन घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली असून, न्यायालयात हजर करून त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

ही घटना मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी जहानाबाद येथे गेली होती. परीक्षा आटोपल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ती ट्रेनने मखदुमपूर रेल्वे स्थानकावर उतरली. घर गाठण्यासाठी उशीर होत असल्याने तिने स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या एका ऑटोमधून घरी जाण्याचा निर्णय घेतला.

ऑटोचालकाने विद्यार्थिनीला घेऊन प्रवास सुरू केला. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्याने अचानक मार्ग बदलत ऑटो चुकीच्या दिशेने नेला. पुढे एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने ऑटो थांबवला आणि विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडिता जोरजोरात मदतीसाठी ओरडत होती, मात्र परिसर ओसाड असल्याने तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी कसाबसा घरी पोहोचली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय हादरले आणि तात्काळ तिला घेऊन मखदुमपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे पीडितेने रडत रडत ऑटोचालकाने केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp