पोलीस कॉन्स्टेबलचा 5 कोटींचा बंगला पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांना शब्द फुटेनात, प्राडाच्या वस्तू अन् महागड्या ब्रँडची सजावट

मुंबई तक

Dismissed UP cop's bungalow in posh Lucknow locality of rs 5 Crore : सेवेतून बडतर्फ झालेल्या आलोक प्रताप सिंगच्या लखनौमधील आलिशान बंगल्याने तपास यंत्रणांचे डोळे दिपवले. साधा कॉन्स्टेबल म्हणून ओळख असलेला हा व्यक्ती प्रत्यक्षात ऐषआरामी आयुष्य जगत होता, याचे धक्कादायक चित्र छाप्यांमधून समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Dismissed UP cop's bungalow in posh Lucknow locality of rs 5 Crore
Dismissed UP cop's bungalow in posh Lucknow locality of rs 5 Crore
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस कॉन्स्टेबलचा 5 कोटींचा बंगला पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांना शब्द फुटेनात

point

प्राडाच्या वस्तू अन् महागड्या ब्रँडची सजावट

Dismissed UP cop's bungalow in posh Lucknow locality of rs 5 Crore : लखनौ : पोलीस खात्यातील  40 हजार पगार असणाऱ्या एका कॉन्स्टेबलकडे एवढी अफाट श्रीमंती कशी जमू शकते, हा प्रश्न अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनाच पडला. कफ सिरपच्या बेकायदेशीर व्यापारात अडकलेल्या आणि सेवेतून बडतर्फ झालेल्या आलोक प्रताप सिंगच्या लखनौमधील आलिशान बंगल्याने तपास यंत्रणांचे डोळे दिपवले. साधा कॉन्स्टेबल म्हणून ओळख असलेला हा व्यक्ती प्रत्यक्षात ऐषआरामी आयुष्य जगत होता, याचे धक्कादायक चित्र छाप्यांमधून समोर आले आहे.

लखनौ–सुलतानपूर महामार्गालगत सुमारे 7 हजार चौरस फुटांच्या परिसरात उभारलेला हा दोन मजली बंगला म्हणजे दिखाऊ श्रीमंतीचा नमुना आहे. युरोपियन पद्धतीची अंतर्गत सजावट, गोलाकार जिने, उंच खांब, रुंद बाल्कनी, कोरीव कठडे आणि जुन्या काळातील प्रकाशयोजना पाहून ईडीचे अधिकारीही क्षणभर स्तब्ध झाले. या बंगल्याच्या केवळ अंतर्गत सजावटीसाठीच दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर संपूर्ण बांधकामाची किंमत पाच कोटींच्या आसपास पोहोचते, असे तपासात समोर येत आहे.

छाप्यादरम्यान घरातून प्राडा आणि गुच्चीसारख्या नामांकित ब्रँडच्या हँडबॅग्ज, प्रीमियम राडो घड्याळे, महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि लक्झरी वस्तूंचा साठा सापडला. एका बाजूला पोलिस खात्यातील शिस्त, नियम आणि जबाबदारीचा बडगा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला काळ्या पैशातून ऐषआराम उभारायचा हा दुटप्पीपणा तपास यंत्रणांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. सरकारमान्य मूल्यांकन अधिकाऱ्याची नियुक्ती करून या संपत्तीचा नेमका हिशोब लावण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली

हे वाचलं का?

    follow whatsapp